शिर्डी लायन्स कडून अर्सेनिक अल्बम-30 चे वितरण

4

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
कोपरगाव : राहाता तालुक्यातील शिर्डी येथील लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई यांच्याकडून शिर्डीतील नागरिकांसाठी आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधांचे वितरण मोफत करण्यात आले आहे.भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचविल्यानुसार प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अल्बम सैनिक अर्सेनिक अल्बम हे औषध प्रभावी ठरत आहे.
अर्सेनिक अल्बम 30 औषध आयुष मंत्रालय दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोविड-19 या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बम-30 या होमीओपॅथी औषधाचा वापर केल्यास फायदा होत आहे असे नमूद केले आहे.या अनुषंगाने लायन्स क्लबने सदर औषधाचे मोफत वितरण प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपलब्ध केलेले आहे.ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी हे औषध मोफत घेऊन जावे,असे आवाहन शिर्डी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉ एकनाथ गोंदकर यांनी केले आहे.लायन्स क्लबच्या वतीने शिर्डीतील सिल्व्हर ओक सोसायटी मध्ये या होमिओपॅथीक अर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष भाऊसाहेब लवांडे,सचिव अ‍ॅड.संदीप गोंदकर,प्रा रघुनाथ गोंदकर,प्रा.विकास शिवगजे,गंगाधर वरघुडे,विजय थोरात,वसंतराव घुगे,सागर कुलकर्णी,रजनी गोंदकर,शोभा गोंदकर,नंदा घुगे,रेखा वैद्य उपस्थित होते.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here