ग्रामपंचायत कर्मचारी पगारापासून वंचित

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
शिरसगाव: कोरोनाचे संकटात सर्वात जास्त जोखमीची कामे ही ग्रामपंचायत कर्मचारी करीत आहेत गावातील दुकाने वेळेत बंद करणे,तसेच गावात नागरिक एकत्र जमू न देणे,बाहेरून आलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात आणणे ही सर्व कामे करीत आहेत. अनेक रोषाना सामोरे जावे लागते.विलगीकरण कक्षात रात्रंदिवस जाऊन पहारा करावा लागतो.असे असताना या ग्रा.प.कर्मचार्‍यांना पगारापासून वंचित ठेवले जाते.ऐन मार्च महिन्यात लॉकडाऊन चालू झाल्याने ग्रा.प.ची वसुली झाली नाही.तरी ग्रामपंचायतीची परिस्थिती नसल्याने बर्‍याच दिवसापासून ऑनलाईन वेतन नाही.उपासमारीची वेळ आली आहे.तरी ते कोरोना व ग्रा,प,चे काम वेळेत करीत आहेत.तरी त्यांना पगाराविषयी राहणीमान भत्ता मिळत नाही.तो ग्रामविकास मंत्री यांनी त्वरित द्यावा.व 100 टक्के वेतनाची घोषणा केली.तीन महिन्यापासून पगार नाहीत त्याची लवकर व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना श्रीरामपूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब कदम यांनी केली आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here