वादळाने घराचे पत्रे उडाले; पाच लाखांचे नुकसान

0

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
पिंपरणे : संगमनेर तालुक्यातील पुर्व भागाकडील असणार्‍या पानोडी गावाच्या माळरानात वादळात घराचे पत्रे उडून चार ते पाच लाखाचे नूकसान होवून संसार उघडयावर पडला. बुधवारी संपूर्ण राज्यात चक्रीवादळाने थैमान घातले मात्र संगमनेर तालुक्यातील पुर्व भागा पाऊस व वार्‍यामुळे किरकोळ नुकसानाव्यतिरित कुठली मोठी हानी झाली नाही. कोणाच्या ध्यानीमनी नसताना शुक्रवारी दि. 5 जून रोजी अचानक पावसाच्या तुरळक सरी बरसू लागल्या तर बारा सव्वा बाराच्या दरम्यान पानोडीच्या पूर्व भागाकडील माळरानावर राहत असलेल्या नय्युम हुसेन सय्यद यांच्या घराजवळ अचानक वावटळ तयार झाली. या वावटळीने एवढा रौद्र धारण केले की, काही क्षणात 400 ते 500 फुटाच्या अंतरावर राहणार्‍या अलिम हुसेन सय्यद यांच्या दगडचा असणारा पडवीचा बिंब उपटून घराच्या भिंतीत असणार्‍या अँगल, पाईप व इतर वस्तूसह 40, 45 पत्राने हजारो फूट आकाशाकडे झेप घेवून अडीच ते तीन हजार फुटाच्या अंतरावर जावून पडले. या वावटळीत संसारोपयोगी 4 ते 5 लाखाचे नूकसान झाले; मात्र महमुद नावाच्या 32 वर्षीय युवकांस किरकोळ डोक्याला दु:खापत झाली. घटनेच्या ठिकाणी घरात 8 लहान लहान मुले व महिला हे मात्र बालंबाल बचावले तर 45 पत्र्यांचा आकाशी होणारा संचार बघून काही क्षण घबराटीचे निर्माण झाले होते. म्हणत्यात ना ! देव तारी त्याला कोण मारी
रोज घराच्या अँगलला झोळी बांधून दुपारच्या दरम्यान घरातील लहान मुलांना त्यात झोपी लावले जात असे; मात्र आज ती वेळ नव्हती. मोठ्या कष्टातून अलिम सय्यद यांची संसाराची गाडी रुळावर आली अन् काही सेंकदात आलेल्या वावटळीने कुटुबांला उघडे केले. पावसाच्या रिमझीममध्ये धान्य, कपाटे, टीव्ही, फॅन, सोफा, फर्निचरसह संसारोपगी वस्तूचे नूकसान झाले. घराच्या भिंती पडल्या असे 4 ते 5 लाखाचे सय्यद यांचे नुकसान झाले. घटनेची वार्ता कळताच गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थांनी घटनास्थळी धावू घेतली. तलाठी जाधव यांनी घटनास्थळी येवून तातडीने पंचनामा केला; मात्र आज हे कुटुंब उघड्यावर पडले असून पावसाळ्याचे दिवस असून शासनाने त्वरित या कुटुबांला मदत भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here