!!भास्करायणः१६!!
आपण जबाबादार नागरिक आहोत?

Rashtra Sahyadri Article

जणू कोरोना पक्ष व मुख्यमंत्री कोण हे बघून अटॅक करतोय! या भंपक माध्यमभैरवांनी संकटाचे गांभिर्यच घालवले. बर राजकीय व्देष इतका घृणास्पद की, यांना शिकलेले म्हणावे की हुकलेले, असा प्रश्न पडावा…


शालेय जिवनात आपण दररोज भारत माझा देश आहे…. ही प्रतिज्ञा घेत असतो. त्याचे कारण देशप्रेम, बधुभाव, संस्कृती, परंपरा याबाबतच्या निष्ठा दृढ व्हावा हा आसतो. आज याचे सिंहावलोकन केले, तर आतिशय विदारक व दाहक वास्तव समोर येते. सध्या देशावर करोनाचे भयावह संकट आहे. याचबरोबरीने अर्थव्यवस्था कोलमडण्याची स्थिती आहे. आवघ्या जगातील देश एकजूटीने या सकटाचा गांभिर्याने मुकाबला करीत आहे.


आपल्याकडे मात्र नेमके वेगळे चित्र दिसते. करोनाच्या संकटाबाबत आपणास पुरेसे गांभिर्य नसल्याचेच दिसते. पंतप्रधान, मुख्यंमंत्री सगळेजण घरातच राहा, अनावश्यक गर्दी करु नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, शिस्त पाळा असे आवाहन करीत आहेत. याला प्रतिसद देण्याऐवजी, कारण नसताना बाहेर पडणे. घोळक्याने जमणे, टगेगिरी करणे असे ‘देशकार्य’ काही महाभाग करित आहेत. आपल्ला बेजबाबादारपणा अनेक निष्पिप व निरापराधावर विनाकाररण बेतेल, याचा साधा विचारही हे गावटगे करित नाहीत.
दुसरीकडे आपलं घरदार, बायकामुलं यांना घरी सोडून डाॕक्टर, आरोग्य व पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे. त्यांना कारण नसताना मारहाण करणे, असे प्रकारही घडले आहेत आणि घडत आहेत. या कर्मचाऱ्यांवर कामाचा शारिरीक व मानसिक ताण आहे. अशावेळी त्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांना त्रास दिला जात आहे. अर्थात अनेकांनी त्यांचेवर फुले उधळून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त केल्याचे दुर्मिळ दृश्ये ही बघावयास मिळाली.
येथपर्यन्त ठिक आहे. सगळ्यांनी पंतप्रधानांचे आवाहनास लोकांंनी प्रतिसाद दिला. मात्र प्रत्यक्षात जे घडते आहे ते निराशाजनक आहे. अनेकठिकाणी नियम धाब्यावर बसविले गेले. पोलिसांना मोटार सायकलने फरफटत नेले गेले. आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार झाले. काही महिला कर्मचारी भगिनीबाबात अशोभानिय, लाजिरवाणे प्रकार घडले. भाजीपाला विक्री बाद राहाणार नाही आसे वारंवार सांगितले जात आसताना, भाजीपाला खरेदीसाठी खरेदीसाठी झुंबड उडाली. दारु खरेदीसाठी तर जत्रेचेच रुप आले, याला काय म्हणावे?

अनेक महाभागांनी अफवाचे पिक जोमाने फैलावले. जी बिचारी निराधार आहेत, ज्यांना निवारा नाही.दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, अशा परप्रांतीय स्थलांतरितांमध्ये वेगवेगळ्या, वावड्या पसरविण्यात आल्या. घराची, ओढ लागलेले हजारो जीव रेल्वेस्टेशनवर जमा झाले. काहिंना पोलिसांच्या रोषाला बळी पडावे लागले. तर काहिंना अफवांमुळे आपला जिव गमवावा लागाला. काहिजण रेल्वेने चिरडले गेले, काही अपघातात मरण पावले. कशामुळे? तर केवळ अफवेमुळे. असे अफवा पिकविणारे माथेफिरु व निर्दयीच म्हटले पाहिजे.
अनेक गावपुढा-यांनी तर कहरच केला. एखादी निवडणूक असावी या थाटात हे महाभाग साबणी, सॕनिटायझर, धान्य घोळक्याने वाटीत फिरत होते. वाटण्याला आक्षेप नाही, पण गोरगरीबांसह सामान वाटण्याचे फोटो काढून ते वृत्तपत्रातून प्रसिध्दिसाठी खटाटोप कशासाठी. समाजसेवा करायची तर ती प्रसिध्दिसाठी नसावी. ती केवळ माणूसकी म्हणून असावी. पुढारीच भान सोडून बेभान झाल्याने तरुणांचे टोळकेच्या टोळके रस्त्यावर आले. त्यांना आवरताना पोलिसांची दमछाक झाली. पोलिसांनी यांच्यामागे पळायचे आणि या टवाळांनी दात काढित गल्लीबोळात घुसायचे. जणू पाठाशिवणीचा खेळ खेळत होते असा सगळा घृणास्पद प्रकार.
दुसरीकडे प्रसिध्दी माध्यमांवर वेगळीच लढाई जुंपलेली दिसते. ही लढाई राजकिय महाभागांची. अशा संकटकाळी देश संघ असायला हवा.पण या माध्यमभैरवांनी पक्षनिहाय देशाची वाटणी करुन टाकली. ह्या राज्यात इतके रुग्ण असताना त्या राज्यात जास्त कसे? येथे अमूक पक्षाचे राज्य व अमूक व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून कोरोना जास्त. तिकडे बघा कोरोना कसा काबूत आहे. जणू कोरोना पक्ष व मुख्यमंत्री कोण हे बघून अटॅक करतोय! या भंपक माध्यमभैरवांनी संकटाचे गांभिर्यच घालवले. बर राजकीय व्देष इतका घृणास्पद की, यांना शिकलेले म्हणावे की हुकलेले, असा प्रश्न पडावा.

यांचे ठायी महाराष्ट्र तर जणू शत्रुराष्ट्रच! केवळ सत्ता गेली म्हणून आपत्तीत राजकारण करायचे, यात कसला शहाणपणा? बर शब्दांचा वापरही इतक्या खालच्या थराचा की, शाळकरी पोरं बरी. काहीही माहिती न घेता पोस्ट टाकायच्या आणि निंदानालस्ती करुन क्षणिक समाधान मिळवायचे, याला देशप्रेम म्हणायचे? पंतप्रधानांनी मानसिक बळ मिळावे यासाठी घंटानाद, थाळीनाद, दिवे लावणे असे उपक्रम ठेवले. त्यामागे अत्यंय संकटजागृति व त्याविरोधात एकसंघ उभे असल्याचा उदात्त हेतू होता. काहिंनी ह्या हेतूला हरताळ फासून मिरवणूका काढल्या,फटाके फोडून दिवाळी साजरी केली. याला हसावे की रडावे, हेच समजत नाही.

तर हे असे आहे. कोरोना संकटाने आपली बेपर्वाई, बेफिकीरता, उथळपणा दाखवून दिला आहे. तसेच आपले देशप्रेम किती दिखाऊ आहे, हे सुध्दा अधोरेखित केले. कोरोना काळातील ह्या घटना बघता, आपण खरंच सूज्ञ व जबाबदार नागरीक आहोत का, असा प्रश्न निर्माण होतो. अर्थात कोरोना काळात काही देशहिताच्या गोष्टी घडल्या. मानवतेचे व जबाबदारीचे दर्शन घडले. अनेकानी अशा संकटसमयी देश म्हणून कसे उभे राहावे, हे आपल्या कृतीतून दाखविले, ही त्यातल्यात्यात जमेची बाजू म्हणता येईल.
भास्कर खंडागळे ,बेलापूर
(९८९०८४५५५१ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here