Techno Updates : ‘Mitron’ या देशी टिकटॉकचे गुगल प्ले स्टोअरवर शानदार ‘पुनरागमन’

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

टिकटॉक प्रमाणेच फिचर्स असलेला Mitron या देशी अॅपचे गुगल प्ले स्टोअरवर पुन्हा एकदा शानदार पुनरागमन झाले आहे. देशाविरोधी कारवाया करणा-या चीनला धडा शिकवण्यासाठी सध्या चिनी अॅपला अनइन्स्टॉल करण्याची सध्या मोहिम सुरू आहे. याचा फायदा मित्रों या अॅपला झाला होता. तब्बल 50 लाख युझर्सनी हे अॅप डाऊनलोड केले होते. मात्र, नंतर काही कारणास्तव गुगल प्ले स्टोअरवरने हे अॅप हटवले होते.

कोणत्याही गाण्यावर स्वतःचे व्हिडिओ टाकता येतात. त्यामुळे टिकटॉक हे चायनिज अॅप प्रचंड लोकप्रिय झाले आहे. टिकटॉकप्रमाणेच फिचर्स देणा-या मित्रो अॅपला बायकॉट चायना म्हणणा-यांनी मोठा प्रतिसाद दिला. मात्र, गुगलच्या नियमाप्रमाणे एकसारखे फिचर्स असलेले अॅप ठेवता येत नाही. त्यात व्हरायटी हवी, म्हणून मित्रो या अॅपला प्ले स्टोअरवरून हटवले होते.

त्यानंतर मित्रोंच्या व्यवस्थापकांशी गुगलची सविस्तर बोलणी झाली. या दरम्यान चीनमुळे जगात फैलावलेला कोरोना तसेच चीनच्या देशविरोधी कारवाया यासाठी चीनबाबत मोठ्या प्रमाणात रोष आहे. मित्रोंने आणखी काही नवीन फिचर्ससह हे अॅप पुन्हा लाँच करून प्ले स्टोरवर पुन्हा जागा मिळाली आहे. त्यामुळे टिकटॉक वापरणा-या सर्वांना पुन्हा एकदा मित्रोंच्या रुपाने देशी टिकटॉक उपलब्ध झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here