Beed : पाच लाख नागरिकांना आर्सेनिक अल्बमचा डोस

0
माजीमंत्री क्षीरसागरांचा कोरोना मुक्तीचा उपक्रम
बीड : कोरोना संकटापासून बचाव व्हावा, शरीरातील प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी आर्सेनिक अल्बम हे होमिओपॅथी औषध गुणकारी ठरत आहे. त्या आर्सेनिक अल्बमचे बीडमध्ये काकू नाना प्रतिष्ठान व सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या वतीने पाच लाख नागरिकांना मोफत डोस देण्याचा शुभारंभ करण्यात आला. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली. प्रातिनिधीक स्वरूपात पत्रकार व जिल्हा आरोग्य विभागाचे वतीने डॉ पिंगळे, जिल्हा वकील संघाचे वतीने ऍड हंगे, पतंजली योगपीठ बीडच्या वतीने ऍड श्रीराम लाखे, निमा आयुर्वेद संघटनेच्या वतीने डॉ. अजित जाधव यांनी आर्सेनिक ही औषधी स्वीकारली. 

यावेळी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, ज्येष्ठ विधीज्ञ कालिदास थिगळे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, डॉ.योगेश क्षीरसागर, अरूण डाके, विलास बडगे, दीनकर कदम, दिलीप गोरे, अ‍ॅड.श्रीराम लाखे, अ‍ॅड.दिनेश हंगे, अ‍ॅड.सर्जेराव तांदळे, जि.प.सदस्य गणपत डोईफोडे, सुधाकर मिसाळ, वैजीनाथ तांदळे, विजय सरवदे यावेळी उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक माजी प्राचार्य डॉ.अरूण भस्मे यांनी केले. तर सूत्रसंचलन प्राचार्य डॉ. महेंद्र गौशाल यांनी केले. बीड मतदार संघातील पाच लाख नागरिकांना हे होमिओपॅथी औषध मोफत दिले जाणार आहे.

यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले संकटाच्या काळात आपण जनतेसाठी धावून जाणे ही संस्कृती आहे. कोरोनाच्या संकटाने बरच काही शिकवले आहे. कोरोनाच्या काळात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बीडमध्ये होमिओपॅथी औषध वाटप होत आहे. आज ही बीड जिल्हा कोरोनापासून दूर आहे. भविष्यात ही कोरोनापासून जिल्हा दूरच रहावा यासाठी होमिओपॅथीचे औषध वाटप करत आहोत. पहिल्या लॉकडाऊननंतर प्रथमच आज संवाद साधत आहे. कोरोनाने सगळे जगच हलवले आहे. अदृश्य शत्रुने केलेला हा हल्ला असून याचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येकजण आज काळजी घेत आहे.
बीड जिल्ह्यात जे कोरोनाचे रूग्ण आढळले ते मुळत: राहणारे बीडचे असले तरी बाहेरगावाहून आलेले आहेत. कोरोनाने अनेक गोष्टी करायला भाग पाडले आहे. या काळात जमेल त्या पद्धतीने मदत करण्याचे काम सर्वांच्या सहकार्यातून केले आहे. लस येईपर्यंत अनेक उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. या काळात प्रतिकारशक्ती वाढवणे व या महामारीला टाळण्यासाठी उपाययोजना करणे हेमहत्वाचे आहे. आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या आर्सेनिक अल्बम या औषधाचा चांगला परिणाम दिसून आल्यामुळे सर्वसामान्य माणसापर्यंत हे औषध मोफत देण्याचा संकल्प आपण केला आहे.
प्रत्येक घरासाठी हे औषध वाटप करण्यात येणार आहे. आपला माणूस निरोगी राहावा, सदृढ राहावा ही या मागची भावना आहे. बीड जिल्हा ग्रीन झोनमध्ये कसा येईल यासाठी काळजी घेणे हेच महत्वाचे आहे. संपूर्ण विश्वाला व्यापून टाकेल, असा हा भयानक रोग असून याचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाने खंबीरपणे दक्षता घेणे गरजेचे आहे. सजग व सावध राहून याचा मुकाबला करता येतो असेही ते म्हणाले.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. भरतभूषण क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष कालिदास थिगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख कार्यकत्र्यांसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम सामाजिक अंतराचे नियम पाळून करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here