Ahmednagar Breaking : जिल्ह्यात आज 5 नवीन रुग्ण तर 12 जण कोरोना मुक्त

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जिल्ह्यात आज आणखी 5 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून 12 व्यक्ती आज कोरोनामुक्त झाल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२१ कोरोनाग्रस्त बरे होऊन परतले आहेत. तर सध्या जिल्ह्यात ८० अॅक्टिव रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर यांनी दिली आहे.

नवीन रुग्ण : नगर शहरासह राहता व कोपरगाव गाव तालुक्यातील एका 14 वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा

राहाता तालुक्यातील निघोज निमगाव येथील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. प्रवरा नगर येथील ३४ वर्षीय महिला आणि अकरा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. तर नगर शहरातील पाचपीर चावडी येथील ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनची लागण झाली असून हा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला होता. तर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील १४ वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे.

आज कोरोना मुक्त होऊन घरी परतलेल्यांमध्ये नगर शहरातील ०५, संगमनेर येथील ०२ राशीन (कर्जत) येथील ०२ नेवासा, राहता आणि अकोले येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१२
(महानगरपालिका क्षेत्र ४७, अहमदनगर जिल्हा १०८, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ४७)
*जिल्हयातील अॅक्टिव केसेस ८०*
*एकूण स्त्राव तपासणी  २९९४*
निगेटीव  २६८४    रिजेक्टेड  २६   निष्कर्ष न निघालेले १८   अहवाल बाकी ५६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here