भाजपाच्या ‘या’ माजी आमदारावर दारूङ्यांचा हल्ला..!

अनिल पाटील। राष्ट्र सह्याद्री

कोल्हापूरः

भारतीय जनता पार्टीच्या कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर पुण्यात दारूङ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात त्यांच्या दोन बोटानां गंभीर दूःखापत झाली आहे.

कोथरुडमधील सहजानंद सोसायटी भागात दारु पित बसलेल्या तरुणांना जाब विचारणाऱ्या दोघा व्यक्तींवर पहिला हल्ला करण्यात आला. याच परिसरात राहत असणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी घटनास्थळावर जाऊन काय झालं म्हणून विचारणा केल्यानंतर त्यांच्यावरही दारु पिणाऱ्या तरुणांनी हल्ला केला.

या हल्ल्यात मेधा कुलकर्णी यांच्या हाताला व बोटांना दुखापत झालेली आहे.

याप्रकरणी कुलकर्णी यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलेलं आहे. तर बाकींच्यां आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here