Karjat : नगरपंचायतीद्वारे प्रभागनिहाय प्रत्येक कुटुंबाना आर्सेनिक अल्बम 30 चे वाटप

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि ७

कर्जत : आर्सेनिक अल्बम 30 हे मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करीत असून त्याच्या सेवनाने कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे याचे सेवन या काळात करणे आवश्यक बनले आहे असे मत, डॉ. शबनम इनामदार यांनी व्यक्त केले.
त्या कर्जत नगरपंचायत आयोजित आर्सेनिक अल्बम औषध वाटप प्रसंगी बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे म्हणाले की, कोरोना महामारीत कर्जत नगरपंचायतीचे कार्य आणि खबरदारी विशेष ठरले असून त्याची पावती म्हणून शहरात आजतागायत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. याचे खरे श्रेय सर्वसामान्य नागरिकांना असून त्यांनी केलेले सहकार्य महत्वाची भूमिका बाजवणारे होते. पुढील काळात नागरिकांनी असेच सहकार्य कायम ठेवत कोरोनावर मात करणे आवश्यक आहे. यावेळी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कोरोना काळात कर्जतच्या नागरिकांनी सर्व नियम पाळत प्रशासनास सहकार्य केले आहे. ते निश्चित कौतुकास्पद आहे.
या लॉकडाऊन काळात नागरिकांचा संयम उल्लेखनीय होता. आता आपण यावर मात केली आहे. हे निश्चित असले तरी अजून धोका टळला नाही. त्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्स, कायम मास्क वापरणे, घराची आणि परिसराची स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. यासह नागरिक आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी आर्सेनिक अल्बम उपयोगी पडत असल्याने रविवारी सर्व नागरिकांसाठी नगरपंचायतद्वारे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभागातील प्रत्येक कुटुंबांना घरपोच औषध करण्याचा मानस नागरपंचायतीने केला आहे.
यावेळी नगरसेवक सचिन घुले, डॉ. संदीप बरबडे, नगरसेविका मनीषा सोनमाली, वृषाली पाटील, उषा राऊत, नीता कचरे, अमृत काळदाते, अनिल गदादे, ओंकार तोटे, संतोष मेहेत्रे, सतिष समुद्र, नितीन तोरडमल आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या कुटुंबाना आर्सेनिक अल्बम 30 चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू उकिरडे यांनी केले तर आभार संतोष समुद्र यांनी मानले.

कोरोना बरोबर जगण्याची सवय काहीकाळ नागरिकांना करावी लागणार आहे. त्यावर सर्व शासकीय नियम पाळत, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्स आणि मास्कच वापर कायम करत त्यावर मात करने शक्य होणार आहे. त्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 चे वाटप कर्जत नगरपंचायतद्वारे करण्याचा स्तुत्य उपक्रम आज हाती घेतला आहे. नागरिकांनी याचे सेवन करत आपली रोगप्रतिकारक वाढवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 
– गोविंद जाधव, मुख्याधिकारी, कर्जत नगरपंचायत 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here