लोणी खुर्दला पुन्हा धक्का.. आणखी दोन पॉझेटिव्ह

संपर्कातील 6 जणांना घेतले ताब्यात; प्रवरानगर परिसर सील

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
कोल्हार : लोणी खुर्द मध्ये प्रवरानगर सीमेलगत मुंबई येथून आलेले, दहा दिवस क्वारंटाईन केलेले अन आठ दिवस होम क्वारंटाईन केलेले आई अन मुलगा दोघे कोरोना पॉझेटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कातील सहा जणांना तपासणी कामी ताब्यात घेतल्याची माहिती डॉ श्रीपाद मैड यांनी दिली.
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द मध्ये एका शिक्षकाने केलेल्या पार्टीमुळे स्वतः शिक्षक कोरोना पॉझेटिव्ह झाला अन शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. आता त्यापेक्षाही भयाण वास्तव समोर आले आहे. मुंबई येथून आपल्या प्रवरानगर येथे वास्तव्यास असलेल्या भावाकडे 34 वर्षीय बहीण व 10 वर्षीय मुलगा आले होते. सदर भाग लोणी खुर्द ग्रामपंचायत हद्दीत असल्याने त्यांना लोणी खुर्द मधील शाळेत दहा दिवस विलीनीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर सदर चौतीस वर्षीय महिलेस व दहा वर्षाच्या मुलास घरातील एका वेगळ्या खोलीत आठ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र तीन दिवसानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांचे श्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्या दोघांचे अहवाल आज चौदा दिवसानंतर पॉझेटिव्ह आले असल्याची माहिती दाढ प्रा आरोग्य केंद्राचे डॉ श्रीपाद मैड यांनी दिली. सदर घटनेनंतर लोणी खुर्द हद्दीत असलेला प्रवरानगर येथील परिसर डॉ संजय घोलप, ग्रामसेवक शशिकांत चौरे व लोणी पोलीसांनी सील केला आहे. त्यासोबत लगत असलेल्या कोल्हार बुद्रुक हद्दीतील पंचवटी मध्ये कोल्हार आरोग्य केंद्राकडून सर्व्हेक्षण व पुन्हा तपासणी मोहीम सुरू केल्याची माहिती डॉ संजय घोलप यांनी दिली आहे.चौदा दिवसानंतर रुग्ण आले समोर….
मुंईहून आल्यावर दहा दिवस क्वारंटाईन, आठ दिवस होम क्वारंटाईन व सर्व तपासण्या झाल्यानंतर चौदा दिवसानंतर सदर महिला व मुलगा आरोग्य तपासणी करूनही चौदा दिवसानंतर पॉझेटिव्ह आढळले. त्यामुळे आता विलगीकरण कक्षातून होम क्वारंटाईन झालेल्या व शहरातून आलेल्या आपल्या नातेवाईकांनी खूप सावधानता बाळगणे आवश्यक बनले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here