खा. गोविंदराव आदिकांचे कार्य दिपस्तंभाप्रमाणे : प्रांताधिकारी पवार

5 व्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबीर । 51 जणांचे रक्तदान

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
श्रीरामपूर : सध्या जगभरात कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर खा. गोविंदराव आदिक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन आदिक कुटुंबीयांनी देशसेवेला हातभार लावण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी अनिल पवार यांनी केले.
खा. गोविंदराव आदिक यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्र कृषक समाज संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील, पुष्पलता आदिक,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, प्रभात उद्योग समूहाचे संचालक किशोर निर्मळ, साखर कामगार रुग्णालयाचे ट्रस्टी कामगार नेते अविनाश आपटे, डॉ. एन. जी. चौधरी, वैद्यकीय संचालक डॉ. रवींद्र जगधने, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमदाडे नित्यसेवा ब्लड बँकेचे डॉ. राजाराम जोंधळे आदी यावेळी उपस्थित होते,
पुढे बोलताना प्रांताधिकारी पवार म्हणाले खा.आदिकांचे कार्य आज दीपस्तंभासारखे आहे, त्यांच्या कार्याची कीर्ती देशभरात होती अतिशय संयमी आणि स्वकर्तृत्वावर ग्रामीण भागातील एक कार्यकर्ता एवढा मोठा होऊ शकतो हे त्यांचे वैशिष्ट्य होते, त्यांचाच वारसा त्यांचे चिरंजीव अविनाश व कन्या अनुराधाताई समर्थपणे चालवतात नगरपरिषदेच्या कामातून अनुराधा ताईंचे काम करण्याची तळमळ आम्ही नेहमी पाहतो सध्या देशभरात कोरोनाचे संकट आहे या पार्श्वभूमीवर सरकारने रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन केले आहे त्या अहवानाला प्रतिसाद देत आदिक कुटुंबीयाने खा. आदिकांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून सरकारच्या या कामाला हातभार लावला आहे असेही पवार म्हणाले .यावेळी अविनाश आदिक म्हणाले देशभरात कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे त्या पार्श्वभूमीवर खा. आदिकांच्या पुण्यतिथीला रक्तदान शिबिर आयोजित करून शासकीय कामास मदत करण्याची आमची भावना आहे सर्वांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले .
यावेळी 51 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले सर्व रक्तदात्यांना आदिक परिवाराच्या वतीने एक झाड व सॅनिटायझर देण्यात आले. यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, बाळासाहेब गांगड, वीज वितरण कंपनीचे अभियंता शरद बंड, साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, विधानसभा अध्यक्ष सुभाष राजुळे, जयंत चौधरी, हंसराज आदिक, भाऊसाहेब वाघ हिंदसेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, माजी नगरसेवक बाबासाहेब खोसरे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, अशोक उपाध्याये, राम टेकावडे, नगरसेवक प्रकाश ढोकणे, भाऊसाहेब डोळस, अल्तमश पटेल, गुरुचरण भटियाणी अफान पटेल, दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे आवृत्ती प्रमुख प्रदीप आहेर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी, राकेश न्याति, तोफिक शेख, सोहेल बारूद वाला, सोहेल शेख, नगरसेवक रईस जहागीरदार, लक्ष्मण धोत्रे, पुरुषोत्तम थोरात, पत्रकार पदमाकर शिंपी, अशोक आदिक, आप्पासाहेब आदिक, एस. के. खान, शरद शिंपी, अनिल पांडे, रमेश कोठारी, कलीम कुरेशी, मल्लू शिंदे, रवी गरेला, अनिरुद्ध भिंगार वाला, मनु शेठ भिंगार वाला, अर्चना पानसरे, श्रकिांत प्रणव पानसरे, हर्षल दांगट गोपाल वाया देशकर, राहुल बोंबले, उदय साबळे, निखिल सानप, संजय रजपुत, भाऊ डाकले, रंगनाथ माने, डॉ. वंदना जगधने, डॉ. शलाका आदीक, डॉ. बी आर आदिक, भगवान आदिक, डॉ. मुकूंद शिंदे, डॉ. आरती शिंदे, डॉ. रवींद्र कुटे, डॉ. दिलीप पडघन, डॉ. रवींद्र कवडे, डॉ. ओम जोंधळे, डॉ. वसंतराव माने, अर्जुन आदिक, अण्णा पतंगे, डॉ. विलासराव आढाव, ऋषिकेश डावखर, विजय डावखर, संदीप आदिक, डॉ. बापूसाहेब आदिक, बापू आदिक, प्रशांत खंडागळे, गणेश ठाणगे, भागचंद औताडे, प्रतिक कवडे, तुषार आदिक, डॉ. शरद सातपुते, किरण ताके, बापूसाहेब पटारे, जयाताई जगताप, सोहेल शेख अनुराधा जोंधळे, योगेश जाधव, विलास ठोंबरे सार्थक कवडे, सागर भागवत, चंद्रकांत सगम, गुलाब गाडेकर, उत्तम पवार, रामभाऊ औताडे, वसंत पवार, उल्हास जगताप, इस्माईल शेख, याकुब बागवान, संजय पाचपिंड शकील भगवान, भाऊसाहेब खिलारी, शिवाजी शेजूळ, अरुण काळे, संजय कालंगडे, मनिषा थोरात, प्रदीप गांधी, अमित मुथा, बाबुराम शर्मा, प्रसन्ना शेटे, अविनाश पोहेकर, अभय खंडागळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here