Georai : दवाखान्याला लागलेल्या आगीत होरपळून डॉक्टरचा मृत्यू

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

गेवराई येथे तलवाडा फाट्यावर बग पिंपळगाव येथील एका दवाखान्याला लागलेल्या आगीत होरपळून एका डॉक्टरचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना आज पहाटे (सोमवारी) दोनच्या सुमारास घडली.

डॉक्टर सुधाकर चोरमुले असे मयताचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, बाग पिंपळगाव येथे डॉक्टर चोरमुले यांचा स्वतःचे दवाखाना आहे. या दवाखान्या शेजारी एक मेडिकल तसेच एक सेवाभावी संस्था आहे. डॉक्टर चोरमुले या परिसरातील नागरिकांना अहोरात्र सेवा देत असत. आज सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांच्या दवाखान्याला अचानक आग लागली.

आग भीषण असल्याने डॉक्टर सुधाकर चोरमुले यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर त्यांचे सहकारी गंभीर रित्या जखमी झाले आहे. दरम्यान, आगीचे कारण अस्पष्ट आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here