Shrigonda : कोरोनामुळे कोचिंग क्लासेसची लाखोंची उलाढाल ठप्प

प्रतिनिधी | दादा सोनवणे | राष्ट्र सह्याद्री
 
श्रीगोंदा- तालुक्यात कोचिंग क्लासेसमध्ये मार्च ते जून महिन्यात सर्वाधिक प्रवेश होतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्रीगोंद्यातील खाजगी क्लास बंद आहेत. परिणामी या काळातील होणारी सुमारे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. खाजगी शिकवण्या बंद असल्यामुळे खाजगी शिक्षकावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
लवकरच शैक्षणिक वर्ष सुरू होणार असले तरीही प्रत्यक्ष शाळा महाविद्यालय व खासगी क्लास सुरू करण्याचा अजूनपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सर्वच क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला असून त्यातून खाजगी क्लासही सुटलेले नाहीत. प्रामुख्याने एमएच-सीईटी एमपीएससी यूपीएससी परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी अनेक शहरांमध्ये खाजगी शिकवणी यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. खासगी क्लास चालकांकडून वर्षभर विविध परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी मार्च ते जून या महिन्यांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात. परंतु याच काळात लॉक डाऊन जाहीर झाल्याने तीन महिन्यापासून खाजगी शिकवण्या बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि क्लास चालकांचा व्यवसाय दोन्ही बंद आहेत.

काही ठिकाणी खाजगी क्लासेस ऑनलाइन चालत आहेत. मात्र त्यात पालक आणि विद्यार्थी तितकेच समाधानी नाहीत. खासगी क्लास चालकांना कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी राज्य शासनाने खासगी शिकवणी अधिनियम समिती स्थापन केली होती. मात्र, त्या समितीचे पुढे काय झाले अजूनपर्यंत कोणालाही माहीत नाही. त्यामुळे श्रीगोंद्यात तब्बल शंभर ते दोनशे खाजगी शिक्षकांवर उदरनिर्वाहाची चिंता समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये बहुतांश लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शाळा महाविद्यालय याचबरोबर शासनाला खाजगी खाजगी क्लासेस सुरू करण्याचे धोरण ठरवावे लागणार आहे. त्यासाठी योग्य नियम निकष तयार करावेत, अशी भूमिका खासगी क्लासेस चालकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.

आर्थिक स्थितीचा पालकांना फटका
श्रीगोंदा शहरांमध्ये खासगी क्लासेसच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचा फटका आता पालकांनाही बसला आहे. त्यामुळे परिस्थिती पाहून काही काळानंतर पालक व मुलांनी खाजगी क्लासला पाठवतील अशी शक्यता आहे, असा आशेचा किरण क्लास चालकांना दिसत आहे, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here