Public Transport : लालपरी अडीच महिन्यानंतर आली शिरूरकासारच्या दारी

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
शिरूरकासार – कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यसरकारने सर्वत्र लॉकडाऊन केले. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने  महत्त्वाची असलेली लालपरी एसटी महामंडळाने स्टॉप केली होती. परंतु सोमवारी शिरूरकासारला तब्बल अडीच महिन्यानंतर दर्शन दिले.
देशासह जग हादरून सोडलेल्या कोरोना या विषाणूने सर्वांनाच हैराण करून सोडले. लहानांपासून वयोवृद्धापर्यंत माणसाला माणूसपण शिकवले असले तरी अति भीतीदायक वातावरण तयार झाले असून यापुढे ही सर्वांनी सामाजिक अंतर पाळलेच पाहिजे. राज्य सरकारने काही प्रमाणात मोकळीक दिली असून जिल्हा अंतर्गत वाहतूक सेवा सुरू झाली. त्यामुळे सोमवारी शिरूरकासारला एसटी महामंडळाची लालपरी आली.
परंतु तब्बल अडीच महिन्यानंतर ती आल्याने तिला डोळे भरून पाहिले. दिवसात बीड-शिरूरकासार हे अंतर 46 किमीचे असल्याने चार खेपा केल्या. परंतु महामंडळाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी यापुढे महामंडळाने बीड-शिरूरकासार ही लालपरी कायम ठेवावी, अशी मागणी होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here