Kopargaon : बारा संशयितांचे श्राव तपासणीसाठी रवाना

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोपरगाव – शहरातील एक महिला डॉक्टर कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या पंधरा जणांचे अहवाल निरंक आले. त्यांचा संपर्कात आलेल्या अन्य बारा व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाने घेऊन त्यांचे श्राव तपासणीसाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगांव शहरातील एका माध्यमिक शाळेत लिपिक म्हणून कार्यरत असलेले मात्र राहाता तालुक्यातील लोणी येथील मूळ रहिवासी असलेल्या इसमाचा कोरोना तपासणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील निकटवर्तीय असे एकूण २० व्यक्तींची रवानगी आरोग्य विभागाने विलगीकरण कक्षात केली होती. त्यांच्या श्रावांची तपासणी करण्यात आली होती. त्यांच्यापैकी आजपर्यंत 15 जणांचे अहवाल निरंक आले आहे. दरम्यान, एका खाजगी महिला डॉक्टर या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्या होत्या. त्यांचा अहवाल खाजगीरित्या तपासणीसाठी पाठवला होता. तो बाधित आल्याने कोपगावात खळबळ उडाली होती. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनी पुन्हा धसका घेतला होता.
तहसीलदार, मुख्याधिकारी व पोलीस अधिकारी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन टप्प्यात पंधरा जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवले होते.त्यांचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून ते पंधराही अहवाल निरंक आले आहे.त्यामुळे कोपरंगावकरानी समाधान व्यक्त केले असताना आज या महिला डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या आणखी १२ व्यक्तींचा शोध घेतला आहे.व त्यांचे विलगीकरण करून त्यांचे अहवाल आज नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला तपासणीसाठी पाठवलेले आहे.आता कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांचे या अहवालाकडे लक्ष लागून आहे.

दरम्यान, धोत्रे येथील आजोबांनी आपल्या नातवांना ठाणे येथून आणले असताना आरोग्य विभागाने त्यांना जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्षात रवाना केले असल्याने धोत्रे गावातील कोरोना साथीच्या संसर्गाचा धोका टळला आहे. मात्र, चौदा वर्षीय नातीला कोरोना संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान या आजोबांची वस्ती गावापासून एकांतात असल्याने या गावात टाळेबंदीची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ही टाळेबंदी टाळणे शक्य असल्याने ती टाळल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सावधगिरी ही धोत्रे गावी कामी आल्याने यापुढे ती अधिक कटाक्षाने पालवी लागणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here