अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी मटकाबुक्कीविरुद्ध कसली कंबर!

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
जालन्यातील कुख्यात मटकामाफिया कमल किशोर बंग याच्यासाठी काम करणाऱ्या टोळीतील संजय तेली व सुरेश अग्रवाल यांच्या जवाहरबाग येथील मटका अड्ड्यावर अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी आज पथकासह धाड टाकली. यावेळी 9 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. रोख रक्कम व जुगार साहित्य असा 1 लाख 72 हजार 575 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर बाजार पोलीस ठाण्यात कमलकिशोर बंग, सुरेश अग्रवाल, संजय तेली यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, कर्मचारी प्रदीप घोडके, विशाल काळे, ज्ञानेश्वर केदारे, संदीप घोडके, शिवाजी डाखुरे, उमेश लाभांगे, बाबासाहेब खरात, प्रीती राठोड यांची कामगिरी.