Jalna : लालबागचा सराईत गुन्हेगार गुलाबखान पठाण दोन वर्षासाठी तडीपार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जालना – लालबागचा सराईत गुन्हेगार गुलाबखान पठाण दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. सदर बाजार पोलिसांनी त्याला जिल्ह्याबाहेर नेऊन सोडले. 

जालना शहरातील लालबाग येथील गुन्हेगार गुलाबखान राजदारखान पठाण याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार केला होता.
या प्रस्तावास उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांनी मंजुरी देत गुलाबखान यास औरंगाबाद व जालना या जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार गुलाबखान यास आज ताब्यात घेवून तडीपार आदेशाची अंमलबजावणी करीत पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर, कर्मचारी सुधीर वाघमारे, स्वप्नील साठेवाड, योगेश पठाडे, बाबा गायकवाड यांनी दे. राजा येथे नेऊन सोडले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here