क्रिकेटच्या मैदानासाठी शेती शाळेची जमीन

1

श्रीरामपूर क्रिकेट असोशिएशनच्या वतीने राहुल पटारे यांनी केलेल्या मागणीचा टाकळीभान ग्रा.पं.ने सकारात्मक विचार केल्याबद्दल तालुक्यासह टाकळीभान येथील क्रिकेट खेळाडू व क्रिकेट प्रेमींनी ग्रामपंचायतीस धन्यवाद दिले आहे.

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
टाकळीभान : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील शेतीशाळेची जमीन क्रिकेटच्या मैदानासाठी करार पध्दतीने मिळावी. या मागणीचा ग्रामपंचायतीकडून सकारात्मक विचार झाला. व सदर जमीन श्रीरामपूर क्रिकेट असोशिएशनला देण्याचा ठराव करण्यात येवून करार पध्दतीने देण्याचे ठरले असल्याची माहीती सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ क्रिकेटपटू राहुल पटारे यांनी दिली आहे. टाकळीभान येथील शेतीशाळेची जमीन भव्य असे क्रिकेटचे मैदान उभे करण्यासाठी श्रीरामपूर क्रिकेट असोशिएशनला करार पध्दतीने देण्यात यावी. या संदर्भातील मागणी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष राहुल पटारे यांनी 26 जानेवारी 2020 च्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीकडे केली होती. सदर मागणीचा टाकळीभान ग्रा.पं.कडून सकारात्मक विचार करण्यात येवून ही जमीन श्रीरामपूर क्रिकेट असोशिएशनला करार पध्दतीने देण्याचे ठरले असल्याने या ठिकाणी भव्य असे क्रिकेटचे मैदान साकारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामुळे टाकळीभान सह परिसरातील क्रिकेटपटूसाठी भविष्यात यामाध्यमातून चांगली संधी उपलब्ध होणार आहे. श्रीरामपूर क्रिकेट असोशिएशन मध्ये अनेक नावाजलेले खेळाडू असून त्यामध्ये प्रामुख्याने उद्योगपती अश्फाकभाई शेख, टेलको क्रिकेट टिमचे कर्णधार व प्रशिक्षक सुरेश भोसले, सुप्रसिध्द खेळाडू बॉबी बकाल, एअर इंडीयाचे खेळाडू धीरज मकासरे, अल्ताब शेख, सुधिर मगर, निलेश बोरा, हरिश बोर्डे, चेतन डिक्कर, ज्ञानेश्वर दरंदले, ज्ञानेश्वर राजळे, जुबेर इनामदार, शैलेश गंगवाल, अ‍ॅड. राजेंद्र कापसे, विलास पटारे आदी नावाजलेले खेळाडू आहे. आजची तरूण पिढी ही सोशल मिडीयाच्या आहारी जाताने दिसत आहे. त्यामुळे मैदानी असलेल्या क्रिकेट तसेच इतर तत्सम खेळाला तरूण मुकला जात आहे. परिणामी आजारांना निमंत्रण मिळत आहे. म्हणून 14 वर्ष व त्यापुढील वयोगटातील खेळाडूंना प्रशिक्षण या मैदानावर देण्यात येणार आहे. त्यामुळे गावातील व तालुक्यातील खेळाडूंना या निमित्ताने एक नामी संधी उपलब्ध होणार आहे. क्रिकेट बरोबरच कबड्डी, हॉलीबॉल, बास्केट बॉल, बॅडमिंटन असे इत्यादी प्रकारचे खेळाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणार असल्याचे पटारे यांनी सांगीतले. सध्या क्रिकेट मैदानावर आंतरराष्र्टीय दर्जाचे टॅर्फ विकेट बनविण्याचे काम जलद गतीने सुरू असून ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान मैदान खेळण्यासाठी उपलब्ध होणार असल्याची माहीती जेष्ठ क्रिकेट पटू राहुल पटारे यांनी दिली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here