वादळाने ‘मुळा’तील मत्स्य प्रकल्पाचे लाखोंचे नुकसान

प्रकल्पग्रस्तांची शासनाकडे मदतीची याचना

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात प्रकल्पातील माशांचे पिंजरे,जाळ्या,मत्स्यबीज,फ्लोटींग हाऊस,बोटी,खाद्य प्रकल्प बांधणीचे अँकर आदी वा-याच्या वेगात तुटून अस्तव्यस्त होत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने साधारणपणे प्रत्येक प्रकल्पधारकाचे अंदाजे 5 ते 10 दहालाखांचे नुकसान झाले आहे, मात्र शासकीय पंचनामे झाले नसल्याने अधिकृत नुकसानीचा आकडा कळू शकलेला नाही.

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
राहुरी : बेरोजगारांसाठी अनुदानीत असलेला केंद्र व राज्य शासन पुरस्कृत बहुलक्षी असलेला राहुरीच्या मुळा धरणातील मत्स्य प्रकल्प दि.3 जुन रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात अस्तव्यस्त होवून झालेले नुकसान कोटीच्या घरात आहे,बेरोजगारांनी उभारलेले प्रकल्प डोळ्यादेखत उद्धस्त झाले प्रकल्पग्रस्तांची शासनाकडे मदतीची याचना.
गेल्या वर्षभरापूर्वी राज्याच्या जलाशयांमधे शासनाच्या वतीने बेरोजगारांसाठी अनुदानीत मत्स्य पालन प्रकल्प उभारुन शेकडो बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी बंदीस्त मत्स्यपालन साधारणपणे 30 लाख रुपये खर्च करुन उभारण्यात आले होते, मुळाजलाशयात 143 मत्स्यप्रकल्पलांना मंजुरी देण्यात आली होती पैकी 80 प्रकल्प बेरोजगार युवकांनी शेतजमीनी गहान ठेवून तर काहींनी सावकारी कर्ज घेतले होते शासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या अनुदानाअगोदर स्वखर्चाने प्रकल्प उभारल्यानंतर शासनाच्या वतीने प्रकल्पाची पाहणी व परिक्षण केल्यानंतरच अनुदान दिले जाते यानुसार अनेकांनी प्रकल्प उभारले असता काहींना 40 ते 70 % टक्के अनुदान मिळाले तर काही प्रकल्पधारक अजूनही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत, प्रकल्प उभारणीसाठी तीस लाखाच्या आसपास खर्च येतो त्यांनतर त्यात बिज सोडण्यासाठी व माशांना पुरवण्यात येणार्‍या खाद्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला,वर्षापूर्वी सुरु झालेल्या प्रकल्पांमधून उत्पादनाला सुरुवात झाली होती तर काहींचे उत्पादन सुरु होण्याअगोदर निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात बंदीस्त मत्स्यपालन व्यवसाय सापडून कोट्यावधीचे नुकसान झालेले आहे. बेरोजगार युवकांवर आपत्तीची कु-हाड कोसळून आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ आलेली आहे,निसर्ग चक्रीवादळाच्या नंतर राज्यभरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत या पार्श्वभूमीवर शासनाने स्वतः पुरस्कृत केलेल्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे तातडीने पंचनामे करुन नुकसान झालेल्या प्रकल्पधारकांना दिलासा देत आर्थिक मदतीचा हात देण्याची गरज आहे अन्यथा आधीच आर्थिकदृष्ट्या हतबल झालेले शेकडो प्रकल्पधारक आर्थिक आरिष्टामुळे मनोधेर्य खचून मानसिक तणावाखाली येण्याची शक्यता प्रकल्पधारकांमधून व्यक्त होत आहे अशात प्रकल्पधारकांनी नुकसान झालेनंतर राहुरीच्या तहसिलदारांना निवेदन सादर करुन शासनाचे लक्ष वेधले आहे.  राहुरीचे नायब निवासी तहसिलदार गणेश तळेकर यांनी प्रकल्पधारकांचे निवेदन स्विकारले याप्रसंगी प्रकल्पधारक सर्वश्री शरद पाचरणे, सलिम शेख, गोरक्षनाथ अडसुरे, नितीन बरे, नानाभाऊ जुंधारे, देवेंद्र लांबे, भगवान खेडेकर सह आदी उपस्थित होते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here