Corona Breaking: संगमनेरच्या तीन महिलांचा मृत्यू; पाच नवे रुग्ण!

3

विकास वाव्हळ। संगमनेर :

आजचा दिवस संगमनेर साठी धक्कादायक ठरला संगमनेर मध्ये आज कोरोना मुळे तीन महिलांचा मृत्यू झाला तर आज नव्यानं पाच जण कोरोना आबाधित असल्याचा अहवाल नुकताच प्रशासनास प्राप्त झालेला आहे त्यामुळे शहरात तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

आज शहरातील नाईकवाड पुरा येथील 65 वर्षीय महिला, मोमिनपुरा येथील 63 वर्षीय महिला व तालुक्यातील शेडगाव येथील 63 वर्षे महिलांचा करून मुळे मृत्यू झाला आहे.तर आज संगमनेर मध्ये नव्याने पाच कोरोना बाधित रुग्णांची भर पडलेली आहे . त्यात शहरातील मदिना नगर येथिल 23 वर्षीय महिला व 52 वर्षीय पुरुष, नाईकवाडपुरा येथील 35 वर्षीय पुरुष , मोमीनपुरा येथील 30 वर्षीय युवक तर तालुक्यातील शेडगाव येथिल 18 वर्षीय युवक यांना कोरोना ची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे.

संगमनेर मध्ये कोरोना बाधितांची संख्या 68 वर जाऊन पोचले आहे. तर संगमनेर तालुक्यात आत्ता पर्यंत एकूण आठ जणांचा कोराना मुळे मृत्यू झालेला आहे. ही आकडेवारी नगर जिल्ह्यातील सर्वात जास्त आहे.त्यात काल प्रशासनातील महत्त्वाच्या पदावरील नायब तहसीलदार यांनाच कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने संगमनेर शहरामध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here