शासनाची 108 रुग्णवाहिका

चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा येथील प्राथमिक आरोग्य केद्राला शासनाची 108 रुग्णवाहिका मिळाली असून चांदा सह परिसरातील रुग्णांसाठी त्याचा उपयोग होणार असल्याची माहिती चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ रजनिकांत पुंड यांनी दिली.
चांदा प्राथमिक आरोग्य केंद्रा अर्तगत जवळपास 17 गावे येत असून सहा ते सात उपकेंद्र आहेत या ठिकाणी रुग्णांची संख्याही मोठी असते तालुका वैद्यकीय अधिकारीअभिराज सुर्यवशी या सुचना व मागदर्शनानुसार विविध आरोग्य सुविधा येथे उपलब्ध होत असून कोरोना वाढता प्रभाव पाहता चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला 108 रुग्णवाहिका देण्यात आल्याने या भागातील रुग्णांची गैरसोय दुर होणार आहे. या रुग्णवाहिकेचे उदघाटन माजी पंचायत समितीचे सभापती कारभारी जावळे, माजी पंचायत समिती सदस्य अनिलराव अडसुरे गावच्या सरपंच सौअरुणा रोहिदास थोरात यांच्या हस्ते नारळ पुष्पहार वाढवुन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सौ सविताताई अडसुरे ग्राप माजी उपसरपंच भाऊसाहेब जावळे, ग्रामपंचायत सदस्य देविदास पासलकर पोलिस पाटिल कैलास अभिनव आरपीआयचे बाबासाहेब आल्हाट केंद्रप्रमुख डॉ रजनिकांत पुंड आरोग्य अधिकारी श्रीमती वैष्णवी गोपालघरे डॉक्टर दराडे सुपरवायझर पंडीत, पालवे, आरोग्य सेविका श्रीमती मांडवे श्रीमती मंडाले श्रीमती शिंदे कर्मचारी मच्छिंद्र भालके पवार आढाव अशोक भालके वसंत रक्ताटे रोहिदास थोरात रुग्णवाहिका कर्मचारी आदिनाथ तुपे नवाब शेख विलास पटारे साहेबराव थोरातआदि उपस्थित होते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here