कर्जवसुली फायनान्स कंपन्यांवर कारवाई करा

नगरसेवक पवार यांची मागणी

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
श्रीरामपूर : देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे या निमित्ताने केंद्र व राज्य शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्य नागरिक प्रचंड आर्थिक संकटाला नागरिक सामोरे जात आहेत. बहुतांश नागरिकांनी सर्व प्रकारचे वाहन तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू कर्जावर घेतले आहे. काही फायनान्स वाल्यांनी कर्ज वसूल करण्यासाठी तगादा लावला आहे. अशा सर्व फायनान्स तसेच मानसिक त्रास देणार्यांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
वारंवार कर्जाचे हफ्ते भरा म्हणून फोन केले जाणे, कर्जाचा हप्ता ठरलेल्या तारखेस भरला नाही तर दंड आकारण्यात येणे, काही नागरिकांनी कर्जावर इलेक्ट्रॉनिक वस्तू उदा. मोबाईल, टीव्ही असे अनेक वस्तू घेतलेल्या असतात त्यानी हफ्ता भरला नाही तर ती वस्तू लॉक करण्यात येत आहे. अशा अनेक समस्यांचे फोन नागरिकांना येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
सध्याची परिस्थिती पाहता आर. बी. आयने सहा महिने ई. एम. आय घेऊ नये असे आदेश दिले असताना काही फायनान्स कंपन्या त्या नियमाचे उल्लंघन करून सक्तीने कर्ज वसुली करत आहे असे प्रकरण समोर आले आहे. तसेच हफ्ते वसुली करणार्यामुळे नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे अशा प्रकारामुळे गंभीर स्वरूपाची घटना घडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून सक्तीने कर्जाचे हप्ते वसूल करणार्यांवर कडक कारवाई करण्याची नियमावली बनवण्यात यावी तसेच पैश्यांसाठी तगादा लावणार्यांवर कारवाई करावी अशी मागणी पवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here