वादळातील नुकसान ग्रस्तांना आ. विखे पाटलांचा मदतीचा हात

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
पिंपरणे : संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील माळरानावर राहणार्‍या अलिम हुसेनभाई सय्यद यांचे नूकत्याचं झालेल्या वावटळीमध्ये संसार उध्वस्त होवून लाखोचे नूकसान झाल्याने त्यांतून कुटुब उघड्यावर पडल्याने माजी मंत्री तथा शिर्डी विधानसभेचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सय्यद यांच्या कुटुबांला उभारी देण्यासाठी आर्थिक साहाय्य करण्यात आले.
शुक्रवारी तुरलळ अशा पावसाच्या सरी बरसत असताना बारा, सव्वा बाराच्या दरम्यान माळरानावर वावटळ उठले . या भयानक अशा वावटळीत काही सेंकदात सय्यद यांनी आपल्या आयुष्यात उभा केलेला संसार उध्वस्त झाला . कुटुबांतील नशिब बलवंत्तर असल्याने लहान लहान मुलासह महीला सुखरुप राहील्या . मात्र घरासह संसाराचे मोठे नूकसान झाले . या कुटुबांला प्राथमिक स्वरूपात उभारी देण्यासाठी माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्या सौ रोहीनीताई निघुते यांच्या मार्फत अकरा हजाराचे अर्थसाहाय्य पाठवून एक सामाजिक दायित्व केले . यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ रोहीनीताई निघुते यांनी अकरा हजाराचे अर्थसहाय्य हे अलिमभाई सय्यद यांच्याकडे पदमश्री विखे सहकारी साखर कारखान्याचे संचालक जेहूरभाई शेख, उपसंरपच अशोकराव तळेकर, ग्रामसेविका रोहीनी नवले, सुजित श्रीरसागर, नय्युम सय्यद मेहमुद सय्यद, फिरोज सय्यद यांच्या उपस्थितीत सुर्पुत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here