Jalna : Corona Updates : जिल्ह्यात आणखी 14 पॉझिटिव्ह

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

जालना – जिल्ह्यातील आणखी 14 रुग्णांचा स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. 

पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींमध्ये जालना शहरातील बालाजीनगर येथील-5, मोदीखाना येथील– 2,  गुडलागल्ली येथील -1, सरस्वती मंदीर परिसरातील – 3, बेथल ता. जालना येथील -2, सोनपिंपळगाव ता. अंबड येथील -1 अशा एकूण 14 व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातुन मठपिंपळगांव ता. अंबड येथील 40 वर्षीय एक महिला, धावडा ता. भोकरदन येथील 29 वर्षीय एक पुरुष, गोलावाडी- गणेश नगर ता. जालना येथील 40 वर्षीय एक महिला असे एकुण 03 कोरोनाबाधित रुग्णावर यशस्वी उपचार करुन व त्या सर्वांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्यांनाडिस्चार्ज देण्यात आला.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here