Newasa : गेल्या 2 ते 3 वर्षांपासून बंद असलेली गळनिंब पाणी योजना सुरू

प्रशांत गडाखांचा यशस्वी पाठपुरावा

प्रतिनिधी| राष्ट्र सह्याद्री

गेल्या 2 ते 3 वर्षांपासून बंद असलेली गळनिंब पाणी योजना सुरू झाली आहे. या कामासाठी प्रशांत गडाख यांनी यशस्वी पाठपुरावा केला.

सलाबतपूर, जळके खु, जळके बु, गोगलगाव, गिडेगाव यासह या परिसरातील इतर गावांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी म्हणून गोदावरी नदीपात्रातून या गावांना पाईपलाइनद्वारे गळनिंब पाणी योजनेमार्फत पाणी पुरवठा केला जातो. परंतु गेल्या 2 ते 3 वर्षांपासून पाईपलाईनला लागलेली अनेक ठिकाणी गळती, थकीत वीज बिल, पूर्वीच्या लोकप्रतिनिधीची  अनास्था, यंत्रणेचे दुर्लक्ष या बाबीमुळे धरण उशाला असूनही कोरड घशाला, अशी अवस्था पाणी असूनही पिण्यास नाही अशी सलाबतपूर व योजनेअंतर्गत येणाऱ्या गावात झाली होती.
महिला,तरुण यांचेसह ज्येष्ठांना हंडाभर पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. तसेच अशुद्ध पाण्यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. या सर्व अडचणींची माहिती बेलपिंपळगाव गटाचे पालकत्व घेतलेल्या प्रशांत गडाख अध्यक्ष यशवंत सामाजिक प्रतिष्ठान यांना समजताच त्यांनी तात्काळ कार्यवाही करत संबधित पाणी योजनेचा कोरोनाच्या काळात थकीत वीजबिलामुळे खंडित पुरवठा सुरू करणे बाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर चर्चा करत मार्ग काढला. व वीज पुरवठा सुरळीत केला तसेच संबधित पाणी योजनेचे काम पाहणारे उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करत संबंधित ठेकेदारास सर्व लिकेज काढून गळती रोखण्यास सांगितले.
तसेच ज्या ठिकाणी काही शेतकरी लिकेज काढून देत नव्हते. त्यांच्याशी चर्चा करत मध्यस्ती केली व ही गळनिंब पाणी योजना स्वतः लक्ष देत सुरू केली. त्यामुळे गेल्या 2 ते 3 वर्षापासून बंद पडलेली गळनिंब पाणी योजना आज अखेर सुरू झाली. त्यामुळे सलाबतपूर गावात पाणी पोहचले आहे व नागरिकांची व महिलांची पाण्याची गैरसोय दूर होणार आहे.  लवकरच इतरही गावात पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. प्रशांत गडाख यांनी व्यक्तिगत लक्ष देत गळनिंब पाणी योजना सुरू करत महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवल्यामुळे माता भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सलाबतपूर गावात गेल्या 2 ते 3 वर्षांपासून गळनिंब पाणी योजनेचे पाणी येत नव्हते. त्यामुळे भविष्यात कधी पाणी येणार नाही अशी खात्री झाली होती. परंतु प्रशांत गडाख यांनी व्यक्तिगत लक्ष घालत गळनिंब पाणी सुरू केल्याने आमच्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे व नागरिकांची गैरसाय दूर झाली आहे.
– रवींद्र निकम, नागरिक सलाबतपूर
भावासारखे धावत येत प्रशांत गडाख यांनी गळनिंब पाणी योजना सुरू केल्याने आमच्या डोक्यावरील हंडा उतरला आहे. आम्हाला आता योग्य प्रमाणात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. अशुद्ध पाण्यामुळे निर्माण होणारे आजार आता होणार नाही.
–  यास्मिन शेख सलाबतपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here