Shevgaon : ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची राजश्री घुले यांच्याकडून पाहणी

4

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

ढोरजळगांव – शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांव येथील प्राथमिक आरोग्य केन्द्राला नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी भेट देऊन प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या नवीन इमारतींची पाहणी केली.

जिल्हा परीषदेच्या वतीने व राजश्री घुले यांच्या प्रयत्नामुळे 3 कोटी रूपये खर्चाच्या नवीन इमारत बांधकामाला मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत प्राथमिक आरोग्य केद्रांचे भव्यदिव्य काम प्रगतीपथावर असून सुरू असणा-या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य आधिकारी डाँ. बापूसाहेब नागरगोजे, ढोरजळगांवचे वैद्यकीय आधिकारी डॉ. सुशिल बडे, डॉ. जगदीश कुलकर्णी, आरोग्यसुपरवायझर आव्हाड दादा, ढोरजळगांव मलकापूर वि. का संस्थेचे व्हाचेअरमन श्रीधर डोळस, रोहन साबळे, दिंगबर देशमुख ,सतिष खोसे, दत्तात्रय खोसे, राहुल देशमुख, सुरज खोसे, आदी उपस्थित होते.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here