Shevgaon : अधिका-यांच्या निष्काळजी पणामुळे हक्काच्या पाटपाण्यापासून वंचित – मयुरेश्वर संस्थेचा आरोप

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

ढोरजळगांव – शेवगांव तालुक्यातील आव्हाणे बु. येथील मयुरेश्वर पाणीवापर संस्थेला दोन महिने मुळा पाटपाणी रोटेशन सुटूनही मुळा पाटबंधारे अधिका-यांच्या निष्काळजी पणामुळे हक्काच्या पाटपाण्यापासून वंचिंत राहवे लागले, असा आरोप मयुरेश्वर पाणी वापर संस्थेचे चेअरमन अनिल खैरे यांनी बोलताना केला आहे.

यावेळी खैरे बोलताना म्हणाले की, गेल्या दोन महिन्यापासुन मुळा पाटपाणी सुरू असून परीसरातील शेतक-यांचे हक्काचे पाटपाणी आधिकारी वर्गाच्या हलगर्जीपणामुळे ओढे नाल्यांना सोडले जाते संस्थेकडून रितसर भरणा करून घेतला जात असताना बेकायदेशीर सोडलेल्या पाण्याचा खर्च पाणीवापर संस्थेवर टाकला जात आहे. मागील दोन्ही रोटेशनला पूर्णदाबाने पाटपाणी न मिळाल्याने डी वाय दोन चारीवरील शेतक-यांची पिके जळून गेली असून या गोष्टीला जबाबदार कोण असा सवाल खैरे यांनी उपस्थित केला आहे.
मागील दोन महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने शेतक-यांनी दाद कोणाकडे मागावा, असा प्रश्न असून हक्काचे पाटपाण्याचा मागणीसाठी परिसरातील शेतक-यांना आवाज उठविण्यांची वेळ आली आहे. मयुरेश्वर पाणीवापर संस्थेला पूर्णदाबाने पाटपाणी का देण्यात आले नाही. याबाबत संबंधित अधिका-यांची चौकशी करण्यात यावी व पाटपाणी प्रश्नात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून संबधितांवर कारवाईची मागणी अनिल खैरे लाभार्थी शेतक-यांच्या वतीने करण्यात आली आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here