– नायब तहसिलदारांची भूमिका संशयास्पद

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
तालुक्यातील कमळेश्वर धानोरा येथे गत सोमवारी मध्यरात्री वाळू प्रकरणावरून घडलेल्या दोन गटातील वादाची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाने घेतलेली भूमिका संशयास्पद असून कुठे तरी पाणी मुरत असल्याचे देखील ते म्हणाले.
कमळेश्वर धानोरा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा होत असताना त्याची माहिती पोलीस पाटलांनी आपला जीव धोक्यात घालून महसूल प्रशासनाला दिली होती. परंतु बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या लोकांनी आपली माहिती महसूल प्रशासनाला दिल्याच्या संशयावरून पोलीस पाटलांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. हा सर्व प्रकार महसूलच्या पथकासमोर घडत असताना देखील प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली होती.
विशेष म्हणजे घटनास्थळी रिव्हॉल्व्हरचा वापर झाल्यामुळे प्रचंड तणाव देखील निर्माण झाला होता. या प्रकरणी नायब तहसीलदार यांनी बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध कारवाई करणे आवश्यक होते. परंतु त्यांनी ‘राज’कीय दबावाखाली येऊन संबंधित लोकांविरुद्ध कारवाई केली नसल्याचा आरोप देखील आमदार सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होऊन दूध का दूध और पाणी का पाणी होणे गरजेचे असल्याचे देखील ते म्हणाले.
नदीपात्रातील वाळू पट्टयांचे कायदेशीर लिलाव होणे गरजेचे आहे. वाळू माफिया महसूल विभागातील अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून बेकायदेशीर वाळू उपसा करत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यासाठी एक प्रकारे अप्रत्यक्ष मदतच करतात. शिवाय अशा प्रकारामुळे हफ्तेखोरींचे प्रमाण वाढत आहे. कमळेश्वर धानोरा प्रकरणात प्रशासनाला माहिती दिल्याच्या संशयावरून जबाबदार व्यक्तीला जर मारहाण होत असेल तर ती गंभीर बाब असून या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे.
finasteride – http://finasteridepls.com/ how to get finasteride
tadalafil dosage – online tadalafil tadalafil online reviews