Shrigonda : राष्ट्रवादी काँग्रेसचा 21 वा वर्धापन दिन उत्साहात

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
श्रीगोंदा – राष्ट्रवादी काँग्रेसचा 21 वा वर्धापन दिन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस आणि प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या हस्ते राष्ट्रवादी कार्यालयासमोर ध्वजवंदन करण्यात आले. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तसेच त्यांचे कार्य तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्णय यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे घेण्यात आला. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 10 जून हा वर्धापन दिन हा दरवर्षी उत्साहाने साजरा होत असला तरी कोरोना संकटामुळे यंदा सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये. त्याऐवजी सोशिल डिस्टनसिंगचे सर्व नियम पळून रक्तदान शिबिराचे राज्यभर आयोजन करण्यात यावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते.
त्या आवाहनास प्रतिसाद देत माजी आमदार राहुल जगताप यांच्या श्रीगोंदा येथील संपर्क कार्यलयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार जगताप यांनी बोलताना सांगितले की राज्यात थॅलेसेमिया आणि अन्य रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि नागरिकांनी पुढे यावे व इतरांनाही रक्तदानासाठी प्रवृत्त करून रक्तसंचालनाच्या कार्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी मनोहर पोटे, हरिदास शिर्के, अख्तर शेख, ऋषिकेश गायकवाड, राजू लोखंडे, निसार बेपारी, गणेश भोस, प्रशांत गोरे, संतोष कोथिंबीरे, बापूराव सिदनकर, शंकर पाडळे, समीर बोरा, सतीश मखरे, मुकुंद सोनटक्के, शांताराम पोटे, पांडुरंग पोटे, माऊली हिरवे, तुळशीराम जगताप, मंगेश सूर्यवंशी, मंगेश डोके, सोनू कोथिंबीरे, भगवान गोरखे, योगेश गिरमकर, महादेव शेळके तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here