Kopargaon : बेशिस्त व्यापाऱ्यास पोलिसांनी बदडले !

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोपरगाव शहरात सध्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यानी जमावबंदी आदेश व आपली दुकाने सकाळी नऊ ते सांयकाळी पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास केवळ परवानगी दिली आहे. असे असताना कोपरगाव शहरातील निवारा सोसायटीत राज्य पतसंस्था चळवळीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या जवळ असलेल्या व्यापाऱ्यास या सरकारच्या नियमांची माहिती असतानाही त्यांनी आपले दुकान सुरूच ठेवल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना समजली. त्यांनी त्या ठिकाणी थेट आपली हजेरी लावून या व्यापाऱ्यास आपल्या हातातील छडीने चांगलाच चोप दिला. तसेच त्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शहरातील बाकी बेशिस्त व्यापाऱ्यांनीही या घटनेची धास्ती घेतली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढवून ३० जून पर्यंत केली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणा-यांच्या संख्येत वाढ होत आहे. कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.आता एका महिला डॉक्टर महिला व त्या पाठोपाठ आता पाथरे येथील एक कोरोना रुग्णाने या ठिकाणी खाजगी दवाखान्यात उपचार घेतल्याची माहिती उघड झाल्याने आता नागरिकांत या साथीबाबत पुन्हा भय दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर आरोग्य विभागाने संभाजी चौक ते बनकर हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय परिसर या आधीच पूर्ण बंद केला असताना आता ही नवी माहिती उपलब्ध झाली आहे.
कोपरगाव शहर व तालुका कोरोना मुक्त रहावा यासाठी तालुका व शहर प्रशासन मोठी यातायात करीत असून त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यातच कोपरगाव शहर व तालुका व्यापारी महासंघ शिस्तबद्ध व संघटित मानला जात असताना हे गालबोट लागणे नक्कीच भूषणावह नाही. यासाठी व्यापारी महासंघाने याबाबत अधिकची सजगता दाखवणे गरजेचे आहे. सरकारने आता सर्दी-पडसे असले तरी आता रुग्ण थेट नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रुग्ण सापडण्यास मदत मिळत आहे. या खेरीज खाजगी रुग्णालयांनी याबाबत आता अधिक दक्ष राहण्याची वेळ आली आहे. व नागरिकांनी या व्यवस्थेशी सहकार्य करणे गरजेचे आहे.
या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे सचिव सुधीर डागा यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,” कोपरगाव शहरातील व्यापाऱ्यांनी सरकारने दिलेल्या सूचनांचे योग्य पालन करून तालुका प्रशासनाला सहकार्य करावे व कारवाई पासून मुक्त राहाण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here