Rahuri : दिलासादायक, तालुका पुन्हा कोरोना मुक्त

4

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी तालुक्यात बाहेरून दाखल झालेल्या दोन्ही कोरोना बाधित रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. यामुळे राहुरी तालुका पुन्हा कोरोनामुक्त झाला आहे. दरम्यान, लोणी (ता.राहता) येथील कोरोना बाधित रुग्णाशी संपर्कात आलेले 6 जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने मोठे संकट टळल्याचे दिसून आले आहे. प्रशासन सतर्क असताना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार फसियोद्दीन शेख व आरोग्य अधिकारी डॉ.नलिनी विखे यांच्याकडून करण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. पुणे, मुंबई व इतर परिसरातून येणार्‍या नागरिकांची संख्या वाढताच कोरोना रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ झाली आहे. दरम्यान, राहुरी परिसरात वांबोरी येथे कल्याण (चेंबूर) येथून आलेला तरूण कोरोना बाधित झाला होता. त्यानंतर घाटकोपर येथून थेट नगर येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल झालेली टाकळीमिया ता. राहुरी येथील महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता. दोन्ही बाहेरून आलेल्या रुग्णांमुळे राहुरी तालुक्यात दोन रुग्णांची नोंद घेण्यात आली होती.

सदरच्या आकड्यात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यातच नुकतेच प्रवरा परिसरातील लोणी येथे आढळलेल्या कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात सोनगाव, सात्रळ परिसरातील 6 जण आल्याचे समोर आले होते. यामुळे संबंधितांना प्रशासनाने तातडीने ताब्यात घेत त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. सुदैवाने तेथील सर्व संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्‍वास टाकला आहे.दरम्यान, राहुरी तालुक्यातील वांबोरी व टाकळीमिया येथील सापडलेल्या दोन्ही रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आल्याने राहुरी तालुका तुर्तास कोरोना मुक्त असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

राहुरी परिसरात सुमारे हजारोच्या संख्येने परजिल्ह्यातून नागरिक दाखल होत आहे. संबंधितांची तातडीने आरोग्य विभागामार्फत तपासणी केली जात आहे. ग्रामिण भागामध्ये सुमारे 2 हजार 726 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी 62 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. तर 65 जणांना इन्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले. शहरी भागामध्ये 90 जणांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. तर 90 जणांना क्वारंटाईन करून सोडून देण्यात आले आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी विखे व ग्रामिण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डोईफोडे, देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. आण्णासाहेब मासाळ यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाकडून सर्वस्वी उपाययोजना करण्याचे कार्य सुरूच आहे. घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. नागरिकांना कोरोना विषयक माहिती देण्यात आली असून विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी नियमावली देण्यात आली आहे. नागरिकांनी मास्क व सॅनिटायझर वापर करताना शारिरीक अंतर राखावा, गर्दी करू नये, दुकानांमध्ये जाताना काळजी घ्यावी. अशा उपयुक्त सूचना आरोग्य विभागाकडून वेळोवेळी दिल्या जात आहे. लॉकडाऊन शिथील केल्यापासून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. यामुळे शहरासह ग्रामिण भागात गर्दी होताना प्रशासन लक्ष ठेवून आहे. याबाबत आरोग्य विभागानेही दखल घेतली असल्याची माहिती डॉ. नलिनी विखे , डॉ. वर्षा डोईफोडे, डाँ.आण्णासाहेब मासाळ यांनी दिली आहे.

राहुरी तालुक्यातील जतनेने प्रशासनाला यापूवी सहकार्य केल्याने तालुका कोरोनापासून लांब ठेवण्यास यश मिळविले आहे. यापुढेही नागरीकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास कोरोना पासून लांब राहत जनजीवन पुन्हा सुरळीत होण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याची माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिलेली आहे. नागरीकांनी प्रशासनाच्या संपर्कात राहून आरोग्या विषयी सतर्कता बाळण्याचे आवाहन तहसीलदार शेख यांनी केले आहे.

1 लक्ष रुग्णांची तपासणी पूर्ण

             गत 10 दिवसांपासून ग्रामिण भागात आरोग्य विभागाचे 90 पथक तर शहरी भागात 10 पथके घरोघरी जाऊन नागरीकांच्या आरोग्याची तपासणी करीत आहेत. 1 लक्ष नागरीकांची तपासणी पूर्ण झालेली आहे. कोरोना बाबत सर्वस्वी दक्षता बाळगली जात आहे. राहुरी तालुका कोरोना बाधित एकही रुग्ण नसून यापुढेही नागरीकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे बनले आहे. परजिल्ह्यातून आलेल्या नागरीकांबाबत तातडीने प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी केले आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here