दूध धंद्याला कोरोनाची बाधा

शेतकरी आर्थिक अडचणीत

कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याने सर्व काही ठप्प झाले त्यांची झळ शेतकरी व दूध उत्पादकांनाही बसली काही दिवस रोजच्या संकलनाच्च्या निम्या दूधाचेचं संकलन होत होते . तर केवळ 15 ते 20 रुपये लिटर मागे मिळू लागल्याने शेतकरी व दूध उत्पादक हैरान झालेे . पशुखादय हे 1500 ते 1700 या चढत्या भावाने घ्यावे लागते तर बर्‍याच दिवसापासून दुुधाचे बीलचं न मिळाल्याने दूध उत्पादक आर्थिक संकटात सापडला असून आर्थिक हातभार म्हणून शासनाने 15 रूपये अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे 

सुभाष भालेराव । राष्ट्र सह्याद्री
पिंपरणे : ग्रामीण भागातील दुध उत्पादक शेतकरी गेली अनेक वर्षे सातत्याने दुष्काळाचा सामना करतांना पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेली जनावरे व त्या माध्यमातुन शेतकर्‍यांचे प्रपंच चालवणारा व बेरोजगार युवकांना आधार देणार्‍या दुध धंदा कोरोना या महाभयंकर आजाराच्या विळख्यात अडकल्याने दुध धंदा अडचणीत आला असून लॉकडाऊन काळात दूध भावात मोठी घसरण झाल्याने दूध उत्पादक व शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लॉकडाऊनची घोषणा झाल्यामुळे दूध व्यावसायिकांचे सर्व कामाचे हात थांबले तर गेल्या 60 दिवसाच्या कालावधीत दूधाचे पेमेेंट नसल्याने दूध उत्पादक दुहेरी संकटात , दुध धंदा टिकवायचा असेल, तर वेळेवर पेमेंंट व दुधउत्पादक शेतकर्‍यांना लिटरमागे 15 रुपयांचे अनुदान मिळावे अशी मागणी दुध उत्पादक शेतकर्‍यांकडून होत आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यापुर्वी महाराष्ट्रात मागील दुष्काळाने दुध संकलनावर मोठा परिणाम झाला महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर दुधाचा तुटवडा जाणवू लागला त्यामुळे सहकारी संघ. व खाजगी दुध प्रक्रिया केंद्राच्या स्पर्धामध्ये दुधाला लिटरमागे 32 रुपये भाव दुध उत्पादक शेतकर्‍यांना मिळु लागलेे, त्यामुळे दुभत्या गायाच्या किमती वाढल्या. 1 लाख ते दिड लाखापर्यंत विकू लागल्या. दुधाला भाव मिळत असल्यामुळे दुभत्या गायी शेतकरी विकत घेत तर विकत चारा घालून दुध उत्पादक शेतकर्‍यांचा प्रंपच चालत आहे; मात्र या धंद्याला कोरोनोची लागण झाली अन् 32 – 33 रुपये दर मिळणारे दुध अचानक 20 ते 21 रुपयांनी खरेदी होवू लागले. लाखो रुपये गुंतवलेल्या शेतकर्‍यांना मोठा आर्थिक धक्का बसला.
एकिकडे अवकाळी पावसाने गहू, हरबरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले तर कोरोनो या आजाराने संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्या्मुळे भाजीपाला विकत नाही, त्यामुळे बळीराजा सर्व बाजुनी संकटात सापडला आहे. त्यात दुधाला भाव नाही, शेतकरी मोठ्या अस्मानी संकटात सापडला आहे. त्याला आता जिवंतपणी मरत यातना भोगाव्या लागतात. एकिकडे मागील अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. दुष्काळी परिस्थिती, पिण्यासाठी पाणी नसताना सुध्दा दुध उत्पादक व शेतकर्‍यांनी धाडस दाखवून केवळ प्रंपाचाला आधार म्हणून दूध धंंदा जोपासला त्या करिता सायकल, मोटारसायकलहून दूरवरून विकतचा चारा आणून घरासमोरील लक्ष्मीला साभाळले. नफा, तोट्याचा विचार न करता केवळ शेतीपुरक दूध धंदा टिकून ठेवायचा हाच विचार ! पिके नाही, चारा नाही, पाणी नाही व पशुखाद्याचे भडकलेल्या किमती, जनावरांचे आजार व त्यांची औषधे यामुळे हा दूध धंदा संपतो कि काय? अशी भीती निर्माण झाली; मात्र दुध उत्पादकाचे धैर्य, जिद्द व मेहनतीमुळे आजपर्यंत हा धंदा स्थिरता धरुन राहीला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here