कोरोना संकट संपलेले नसून ते टाळण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी : ना.थोरात

3

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
संगमनेर : कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे.त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. हे संकट अजून संपलेले नाही. लॉकडाऊनच्या नंतर सर्व व्यवस्था सुरळीत करणेसाठी सरकार काम करत आहे. लॉकडाऊन मधील शिथिलता ही पूर्णपणे मोकळीक नसून कोरोना हा संक्रमणाच्या टप्प्यावर आला असल्याने प्रत्येक नागरिकाने स्व:तची काळजी घेत स्वयंशिस्त पाळावी असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
राज्यासह अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतांना ना. थोरात म्हणाले कि, कोरोना हा अदृश्य शत्रू आहे.मागील दोन महिन्यांत लॉकडाऊनमुळे त्याची वाढ रोखण्यात यश आले आहे. 75 दिवसानंतर राज्यात मिशन बिगेन अंतर्गत लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. मात्र नागरिकांनी ही पूर्णपणे मोकळीक नाही हे लक्षात घ्यावे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नसून तो काही भागात संक्रमणातून वाढू पाहत आहे. त्याची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे आहे. याच बरोबर मास्कचा वापर,सोशल डिस्टंन्सचा वापर, वेळोवेळी हात स्वच्छ करणे,स्व:त मधील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारात पाले भाज्यांचा वापर करणे गरजेचे आहे.कोरोना संकटात आरोग्य विभाग,महसूल विभाग,पोलिस विभाग,इतर शासकीय कर्मचारी व विविध स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी कोरोना योध्दा म्हणून चांगले काम केले आहे.आपल्याला ही कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडायची असून महाराष्ट्र कोरोनामुक्त करावयाचा आहे.यासाठी प्रत्येकाने स्व:ताची काळजी घेणे आवश्यक आहे.या संकटात कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. असे आवाहन करतांना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणातील नागरिकांनी घाबरुन जावू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
तर आ.डॉ.तांबे म्हणाले कि, राज्यात कोरोनासह चक्रीवादळाचे मोठे संकट आले असून यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,आरोग्यमंत्री राजेश टोपे हे नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रभावीपणे काम करत आहे.प्रशासन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असून नागरिकांनी ही गर्दी टाळून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सर्वांनी स्वंयशिस्त पाळली तर कोरोनाचे संकट दूर होईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here