औरंगाबाद बहिण-भाऊ हत्याकांड : चुलत भावानेच केला घात; मेहुण्याच्या मदतीने हत्या

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

औरंगाबाद येथे बहीण-भावची हत्या करून दीड किलोचे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणाचा उलगडा झाला आहे. चुलत भावानेच मेहुण्याच्या मदतीने दोघांची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

अर्जुन देवचंद राजपुत  (24) रा.रोटेगांव रोड वैजापूर, सतिश काळुराम खंदाडे (20) पाचनवडगांव, अशी आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांनाही लवकरच कोर्टात हजर करणार असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांनी दिली. अवघ्या दोन दिवसात या हत्याकांडाचे धागे पोलिसांनी उलगडले आहे.

बाहेरच्या व्यक्तींनी नव्हे तर ओळखीच्याच कोणीतरी हा घात केला असल्याचा संशय पोलिसांना होता. त्याआधारे पोलिसांनी शोध घेतला. तसेच अद्याप खून करण्याचे कारण समोर आले नसून चोरी हाच उद्देश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

… असा झाला खून
मयताची आई गावी जाताना नेहमी सोनं घालून जात असे. त्यामुळे आरोपींच्या नजरेत हे सोनं आलं. त्या दिवशी मयताची आई जालना जिल्ह्यातील पाचन वडगावला आली. आरोपी सतीश याच्या ते लक्षात आलं. त्याने मेहुणा अर्जुन याला फोन केला. त्यांनी  टू व्हीलर मध्ये 500 रुपयांचं पेट्रोल टाकलं आणि जालना येथून 2 चाकू खरेदी केले. दोघेही लालचंद यांच्या औरंगाबादेतील घरात पोहोचले. चहा प्यायले, कॅरम खेळले. 4 वाजता किरणने या दोघांना फ्रेश होण्यासाठी सांगितले. साबण देण्याच्या बहाण्याने सतीश याने सौरभला बाथरूममध्ये बोलावलं आणि त्याचा गळा चिरला तर मेहुण्याने मागून चाकूचा वार केला. त्याच्या ओरड्यांचा आवाज आल्याने बहीण किरण बाथरूमकडे पळत आली. त्यावेळी आरोपींनी तिचाही गळा चिरला. आणि घरातील सोनं घेऊन पसार झाले.

हे ही वाचा : Crime : बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले
दीड किलो सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली

Crime : बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here