Maharashtra : स्वाभिमानी राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीची ‘ही’ ऑफर

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना  राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना आमदारकीचा हा प्रस्ताव दिला आहे.

राजू शेट्टी या प्रस्तावावर विचार करीत असून दोन दिवसात ते आपला निर्णय कळविणार आहे. तर याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोकण दौ-यावरून परतल्यानंतर होणार आहे.

राजू शेट्टी यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक भाजप व मित्र पक्षांसोबत लढवली होती. मात्र त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी भाजप पासून स्वतःला वेगळे ठेवले केले होते. त्यानंतर आघाडीकडून 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

तर महाविकास आघाडीमध्ये सहभागी होत असताना विधानसभा जागा वाटपाच्या चर्चेवेळी विधान परिषदेची एक जागा मिळावी असा आग्रह त्यांनी धरला होता. दरम्यान, आता राज्यपाल कोट्यातून काही जागा भरल्या जाणार असून यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची त्यांच्या शिरोळ तालुक्यातील निवासस्थानी भेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here