Shrigonda : अखेर ‘ते’ २२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा – उशीरा का होईना पण ढोरजे येथील शेतक-याचे अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा झाले आहे.

मागीलवर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. शासनाने त्या सर्व नुकसानीचे पंचनामे करून त्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे तहसील कार्यालयात जमा होऊन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. मात्र, ढोरजे येथील शेतकऱ्यांचे भानगाव एथील सहकारी बँकेच्या शाखेत ज्या शेतकऱ्यांचे खाते होते त्यांचे खाते नंबर अपूर्ण होते. त्यामुळे नुकसानीची रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. तालुक्यातील सगळ्यांना पैसे मिळाले पण ढोरजे गाव उपाशीच राहिले होते.

याबाबत वारंवार पाठपुरावा करून सदरील चुक दुरुस्त केली जात नव्हती. अखेर तहसीलदार महेंद्र माळी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तहसीलदार माळी यांनी सदरील चूक तातडीने दुरुस्त करण्याचा आदेश दिले. त्यानंतर चूक दुरुस्त करून ३०० शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे २२ लाख रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. याबाबत मनसे तालुकाध्यक्ष अमोल कोहक, काशी विश्वनाथ देवस्थानचे अध्यक्ष सोन्याबापू वाणी, शिवराज व्यवहारे, अनिल टकले सर, शिवाजी वाणी यांनी तहसील कार्यालयात वारंवार पाठपुरावा केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here