Kada : एपीआय सुदाम सिरसाठ यांना आंतरिक सेवा सुरक्षा पदक

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अंभोरा पोलीस ठाण्याचे तत्काकालिन पीएसआय तथा सोयगाव (औ.बाद) पोलिस ठाण्यात एपीआय म्हणून कार्यरत असलेले सुदाम सिरसाठ यांनी नक्षलग्रस्त भागात तीन वर्षे केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल गृहमंत्रालयाकडून आंतरिक सेवा सुरक्षा पदक त्यांना जाहीर झाले आहे. 

एपीआय सुदाम सिरसाठ यांनी सन २०१३ ते १६ या तीन वर्षाच्या सेवा कालावधित गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागामध्ये धाडसी कारवाया करुन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडून याच उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यात आली असून त्यांना आंतरिक सेवा सुरक्षा पदक जाहीर करण्यात आले आहे.
यापूर्वी बीड जिल्ह्यातील अंभोरा, चकलंबा पोलिस ठाण्यात कार्यरत असताना सिरसाठ यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच जातीय सलोखा कायम वृद्धींगत होण्यासाठी आपल्या खाकी वर्दीतील कौशल्य पणाला लावून कर्तृत्वाचा अनोखा ठसा उमटविला होता. त्यांच्या यशाबद्दल एपीआय यशवंत बारवकर, ज्ञानेश्वर कुकलारे पत्रकार व पोलिस मित्रांनी अभिनंदन केले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here