Shrirampur : माळवाडगांव परिसरात जोरदार पाऊस; दमदार पावसाने सुखावला बळीराजा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

माळवाडगांव – गुरुवारी सायंकाळी माळवाडगांव परिसर आणि श्रीरामपूर तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. सुमारे एक तास झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. हा पाऊस खरिपाच्या तयारीसाठी अतिशय पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

माळवाडगांव परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने चांगलीच हजेरी लावली. जवळपास एक तास पावसाची रिपरिप सुरू होती. काही दिवसांपासून माळवाडगांव परिसरात सायंकाळच्या सुमारास आभाळात ढग दाटून येत होते. शुक्रवारी सकाळपासूनच माळवाडगांव परिसरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचच्या सुमारास काळ्या ढगांची हवेत दाटी होऊन पावसाला सुरुवात झाली.

माळवाडगांवसह परिसरातील मुठेवाडगांव,खानापूर,भामाठान,भोकर,खोकर,वडाळा महादेव या सर्व गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागात शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत.काही ठिकाणी कपाशी लागवड सुरू झाली असल्याने बळीराजा पावसाची वाट पाहत असताना झालेले मॉन्सूनचे आगमन सुखकारक असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहे.

गेले काही दिवस ढगाळ हवामान तयार होऊन सोसाट्याचा वारा येत होता. पण, पाऊस पडत नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते.सोयाबीनच्या पेरण्या रखडल्या होत्या. पण, गुरुवारी दुपारनंतर माळवाडगांवसह परिसरातील अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे चेहरे खुलले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here