Banking: वसुलीच्या नावाखाली उक्कलगावमधील राष्ट्रीयकृत बॅकेचा कर्ज देण्यास नकार ;

2

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांच्याकडून तक्रारीची काही तासात दखल

उक्कलगाव : प्रतिनिधी

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील सेन्ट्रल बँकेकडून आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या पाञ लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. थकित असणार्‍या रिकव्हरीच्या नावाखाली राष्ट्रीयकृत बॅकेचा मनमानी कारभारामुळे वैयक्तिक कर्ज देण्यास बँकेकडून टाळाटाळ होत असल्याने लाभार्थ्यांत संतापाची लाट पसरली आहे.

येथिल सहा गावांमधून असणार्‍या राष्ट्रीयकृत बॅकेची सेंट्रल बॅक ऑफ इंडियाची येथे एक शाखा आहे. राष्ट्रीयकृत बॅकेत आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबविले जात असल्याने त्या अंतर्गत महामंडळाने हमी घेतलेल्या वैयक्तिक परतावा कर्ज मिल्क व डेअरी फार्मसाठी कर्ज देण्यास नकार दिला जात आहे. कर्ज परतावा परतफेड साठी महामंडळाने त्यांची हमी घेतली आहे बॅकेची रिकव्हरी नसल्याने कर्ज वाटप करण्यात येत नाहीत असे लाभार्थ्यांना शाखा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबधितांना कर्ज मिळत नसल्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याशी काही तासातच संपर्क साधला असता संबधीतानी कर्ज मिळत नसल्यास त्यांच्याकडेच तक्रारी केल्या. नरेद्र पाटील यांनी तक्रारीची दखल घेत महामंडळाच्या समन्वयकांना सूचना केल्या असून सुचनेची दखल घेत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळचे अहमदनगर जिल्हा समन्वयक अरूण निमसे हे उक्कलगावात दाखल होऊन अधिकाऱ्यास विचारणा केली कर्ज मंजुरी मिळत असतानाच अश्याप्रकारे त्यांची टाळाटाळ का केली जात आहे. अशा पद्धतीने अडवणूक का होत आहे अशी विचारणा त्यांनी केली. अडवणूक होत असल्यामूळे तलसीलदारांशी बोलणार असल्याचे अरूण निमसे यांनी सांगितले याबाबतीत वरिष्ठांना अहवाल सादर करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. शाखाधिकारी यादव हे बाहेरगावी असल्याने त्यांच्याशी चर्चा झाली नसल्याचे निमसे यांनी सांगितले.

उक्कलगाव येथील सेंट्रल बॅकेच्या शाखेकडून आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या पात्र लाभार्थ्यांना कर्ज देण्यास नकार दिल्याने सदर लाभार्थ्याने याबाबतची तक्रार महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडे केली. ना. पाटील यांनी सदर तक्रारीची अवघ्या काही तासातच दखल घेतल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here