Corona: कोल्हापुरात कोरोना कहर… कोरोनाग्रस्थांचा आकडा सातशेच्या वर!

आणखी सहा जणांना लागण…

अनिल पाटील । राष्ट्र सह्याद्री

कोल्हापूरः

जिल्ह्यात आज सहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 702 इतका झाला आहे तर दिवसभरात 22 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने 594 व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. यातून मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या तीन दिवसात शासकीय रूग्णालयाकडून कोरोना तपासणी वेळी घेतलेल्या स्वॅबचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यानुसार करवीर 2, पन्हाळा 2, हातकणंगले 1 तर गडहिंग्लज 1 अशा व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळल्या आहेत.
गेल्या दोन दिवसात बाहेरगावावरून येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने स्वॅब तपासणीची गेल्या महिन्याच्या तुलनेत आलेल्या व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्याची तापसणीही झटपट होऊन अहवाल वेळीच येत आहेत. यात एकूण 6 पॉझिटिव्ह तर उर्वरीत 70 स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक पॉझिटिव्ह व्यक्ती गडहिंग्लजमध्येच व्कारंटाईन होती.
परगावाहून येणाऱ्या व्यक्तींची आरोग्य तपासणी जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात झाली. यात 122 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेत. त्यांचे स्वॅब अहवाल येत्या एक दोन दिवसात मिळणार आहेत. अशी माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.

जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण कोरोनाग्रस्त असे
आजरा 74, भुदरगड 70, चंदगड 74, गडहिंग्लज 80, गगनबावडा 6, हातकणंगले 8, कागल 57, करवीर 14, पन्हाळा 25, राधानगरी 63, शाहूवाडी 175, शिरोळ 7, इचलकरंजी 11, कोल्हापूर शहर 24, अन्य राज्यातील 8.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here