मनोरंजन : हल्की-फुल्की ‘गुलाबो-सिताबो’

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोनामुळे संपूर्ण जग बदलाच्या उंबरठ्यावर आहे. त्याला चित्रपट उद्योगसुद्धा अपवाद नाही. आजपर्यंत मोठा पडदा कायमच सगळ्यांचे आकर्षण राहिला आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्री डेली सोप ओपेरा, यांच्या काळात मोठ्या पडद्याचे आकर्षण थोडे कमी होत आहे असे सांगत असतानाच सगळे थिएटर मल्टीप्लेक्स झाले. अन् मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्यासाठी लोक कायमच उत्सूक असतात. मात्र, लॉकडाऊन मुळे आणखी कितीकाळ मल्टीप्लेक्स सुरू होणार नाही. आणि सुरु झाले तरी व्यवसाय कितपत भेटेल याची खात्र नाही. त्यामुळे मोठ्या पडद्यावर चित्रपट रिलिज करण्यापेक्षा आता लोक चित्रपटही स्ट्रीम करीत आहे.

अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा सुजित सरकार दिग्दर्शीत गुलाबो-सिताबो अमेझॉन प्राईमवर ओटीटी तत्वावर रिलिज (स्ट्रीम) झाला आहे. कॉमेडी प्रकारातील हा चित्रपट असून यामुळे चुपके-चुपके सारख्या हल्क्या-फुल्क्या कॉमेडी चित्रपटांची आठवण होते. जुही चतुर्वेदी लिखित चित्रपटाचे कथानक हा लखनौमधील एक जुनी हवेली आपल्याला कशी मिळेल याभोवती फिरत आहे.

जुन्या काळात भाडेकरी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहत व त्यानंतर त्या ठिकाणी कब्जा करून बसत असत. या धर्तीवर हे कथानक बेतले आहे. यामध्ये अमिताभ बच्चन मिर्जा नावाच्या एका लालची म्हातारा जो हवेलीवर डोळा ठेवून बसला आहे याची भूमिका साकारत आहे. तर आयुष्मान खुराना बांके ही हवेली पुरातत्व विभागाकडे जाऊन आपली राहण्याची कशी सोय होईन आणि मिर्जाला ती कशी मिळणार नाही याच्या प्रयत्नात असतो.

ही हवेली मिर्जा याच्यापेक्षा 17 वर्षांनी मोठ्या असलेल्या त्याच्या बेगमच्या नावावर असते. त्यामुळे ही बेगम कधी एकदा मरते आणि कधी ही हवेली आपल्या नावावर होते याची मिर्जा सतत खटपट करीत असतो. तर ही हवेली मिर्जा याला मिळाली तर हा आपल्याला हवेलीतून काढून टाकेन त्यामुळे ही हवेली त्याला कशी मिळणार नाही याच्यासाठी बांके सतत प्रयत्न करतो.

त्यांच्या या दोघांच्या भांडणाचे किस्से चित्रपटात चांगलेच रंगवले आहे. त्यांची भांडणं म्हणजे टॉम अॅण्ड जेरी सारखी वाटतात. चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा प्रोस्थेटिक मेकअप केला आहे. जो समजून येतो. संपूर्ण चित्रपट हा अमिताभ बच्चन यांनी खेचून नेला आहे. त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही ही भूमिका साकारूच शकणार नाही. हे संपूर्ण चित्रपटात जाणवत राहते. तर आयुषमान खुरानाच्या डायलॉग डिलिव्हरीवर मात्र खूप मर्यादा पडल्या. लखनवी उर्दू बोलताना त्याला खूपच जड गेल्याचे जाणवत राहते.

बाकी चित्रपटातील अन्य कलाकरांवर फोकसच जात नाही. किंबहुना त्यांच्या टॅलेन्टचा उपयोग करून घेता आला नाही. असे वाटते.

बाकी अॅमेझॉनवर स्ट्रीम झालेल्या या चित्रपटाला कसा प्रतिसाद भेटतो हे पाहणेही मनोरंजक ठरेल. या चित्रपटाला उत्कृष्ट प्रतिसाद भेटला तर इथून पुढे थिएटरमध्ये चित्रपट रिलीज करण्यापेक्षा अॅमेझॉनवर स्ट्रीम करण्याचा नवीन ट्रेण्ड सेट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here