Shrigonda : बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी तब्बल 40 जणांवर गुन्हा दाखल

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील अनगरे या ठिकाणी रेशनिंग दुकानांच्या गलथान कारभाराच्या विरोधात तसेच अवैधरित्या वाळू साठा करणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आण्णा हरिभाऊ शेलार यांनी ग्रामपंचायत समोर आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे शासनाचा आदेश मोडून गर्दी केल्याप्रकरणी तब्बल 40 जणांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी एका ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी जिल्ह्यात साथ रोग प्रतिबंध कायदा 1987 अनव्ये शोशल डिस्टन्स व मास्क शिवाय कोणीही फिरणार नाही, असे आदेश पारित केले आहेत. तरीही तालुक्यातील अनगरे या ठिकाणी रेशन दुकान गलथान कारभार तसेच परिसरात अवैध वाळू साठे करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचा मागणीसाठी आण्णा शेलार रा अनगरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आंदोलन चालू केले होते.
मात्र, त्या ठिकाणी जास्त प्रमाणात लोक एकत्र आले असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी निदर्शनास आली. त्यानुसार त्यांनी तब्बल 40 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
त्यामध्ये अनिल संतोष काळे, सागर दत्तात्रय, बाबर बाळासाहेब, ज्ञानदेव थोरात, सतीश रामदास थोरात, मुकिंदा वाल्मीक जोगदंड, संदीप भाऊसाहेब डोके, वसंत पांडुरंग घोलप, तुकाराम वामन थोरात, अण्णा हरिभाऊ शेलार, निखिल चंद्रकांत घोलप, विशाल शिवाजी घोलप, रावसाहेब हरिचंद्र घोलप, शिवाजी मुरलीधर घोलप, रावसाहेब रामा काळे, बाळासाहेब तात्याबा घोलप, शिवाजी श्रीहरी डोके, जगन्नाथ रामा घोलप, माणिक मारुती थोरात, नवनाथ बाळासाहेब घोलप, संतोष बबन घोलप, बाळासाहेब झुंबर घोलप, लालासाहेब झुंबर घोलप, युवराज झुंबर घोलप, सचिन लक्ष्मण घोलप, छगन गजानन घोलप, सुनील संतोष काळे, संदीप बाबासाहेब थोरात, निलेश वसंत थोरात, शिवाजी प्रल्हाद उबाळे, विठ्ठल वामन थोरात, दत्तात्रय हाऊस राव डोके, दिलीप हौसराव ढोके, सागर तुकाराम थोरात, नवनाथ सिताराम ढोके, शिवाजी वामन थोरात, अरुण प्रल्हाद डोके, वसंत मारुती, थोरात संतोष, जगन्नाथ घोलप, युवराज विठ्ठल उबाळे, निखिल सुभाष चांदगुडे, यांच्यावर साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल भानुदास नवले हे करत आहेत

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here