Rahata : एपीआय कंडारे यांना अतिरिक्त सुरक्षा सेवा पदक जाहीर

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहता – पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांना नक्षलग्रस्त गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा जिल्ह्यातील उत्कृष्ट सेवेबद्दल गृह मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून देण्यात येणारे आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.
सध्या राहता पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कंडारे  हे 2015 ते 2018 या कालावधीत गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या ठिकाणी कर्तव्य बजावल्याने नक्षलग्रस्त क्षेत्रात प्रभावित उत्कृष्ट कामगिरी करिता त्यांना केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या वतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.
यामध्ये महाराष्ट्र राज्यातील नक्षलवादी विरोधी कर्तव्य पर बजावलेल्या एकूण 1172 अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते हे पदक देण्यात येणार आहे. तर कंडारे साहेब यांच्या मित्र परिवारात ही बातमी कळताच त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

34 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here