आषाढी वारी : मोजक्या वारक-यांच्या उपस्थितीत तुकोबांची देहू तर एकनाथांच्या पालखीचे पैठण येथून प्रस्थान

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

यंदाच्या आषाढी वारीवर कोरोनाचे सावट असल्यामुळे मोजक्या वारक-यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहू येथून तर संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पैठण येथून प्रस्थान ठेवण्यात आले. 

दरवर्षी पालखी सोहळ्यासाठी हजारो वारकरी देहू आणि पैठण येथे एकत्रित येत. सकाळपासूनच मोठी गर्दी येथे दिसत असे. मात्र, यंदा पालखी सोहळा रद्द करून मोजक्या वारक-यांना परवानगी देऊन परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे.

तुकोबा महाराजांच्या पालखी दशमी पर्यंत मंदिरातच मुक्कामी राहिन. सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार भजन, किर्तन आदी कार्यक्रम होतील. त्यानंतर वाहनांनी पालखी मोजक्या वारक-यांसोबत पंढरपूर येथे घेऊन जाणार आहे.

तर साडेचारशे वर्षांपेक्षा जास्त मोठी परंपरा असलेल्या एकनाथ महाराज पालखी सोहळाही यंदा रद्द करण्यात आला. त्यामुळे 20 वारक-यांच्या उपस्थितीत महाराजांच्या पालखीने आज नाथांच्या जुन्या वाड्यातून दुपारी एक वाजता प्रस्थान ठेवले. दशमी पर्यंत ही पालखी समाधी मंदिरातच मुक्कामी असेल. नंतर वाहनाने पालखी पंढरपूरला नेण्यात येईन.

यावेळी उपस्थित प्रत्येक वारक-याच्या तोंडी कोरोना मुक्त होऊन पुढच्या वर्षी तरी आनंदी आणि उत्साही सोहळा होऊ दे ही प्रार्थना होती. यावेळी तोंडावर मास्क, डोक्यावर टोपी, आणि गळ्यात टाळ असा प्रत्येक वारक-याचा पेहराव होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here