National : दिलासादायक कोरोनाची संख्या दुप्पट होण्याचा वेग कमी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आणि दिवसेंदिवस अधिकाधिक रुग्ण सापडत असताना एक दिलासादायक वृत्त आहे. देशात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा वेग कमी झाला आहे. पूर्वी 15.4 दिवसात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होत असत. आता रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 17.4 दिवस होत आहे. त्यामुळे हे चित्र दिलासादायक आहे.

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा कोरोना मुक्त होण्याचा वेग देखील वाढाला आहे. हा वेग आता 49.47 टक्के इतका झाला आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एक लाख 47 हजार 194 रुग्ण या रोगातून बरे झाले आहे. तर 1 लाख 41 हजार 842 रुग्ण सध्या उपाचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here