Sports : क्रिकेटचा इतिहास हरपला, सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे 100 व्या वर्षी निधन

रायजी यांनी 1940 च्या दशकात नऊ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. क्रिकेटच्या इतिहासावर 8 पुस्तके लिहिली. 26 जानेवारी 2020 मध्ये त्यांनी केली होती वयाची 100 वर्षे पूर्ण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

देशातील सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे निधन झाले. झोपेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालावली. क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर पासून ते ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ अशा सर्वांसाठीच ते प्रेरणा स्थान होते. त्यांच्या जाण्याने क्रिकेटचा चालता-बोलता इतिहास हरपल्याची भावना अनेक क्रिकेटपटूंनी व्यक्त केली. 26 जानेवारीला सचिन तेंडूलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ या दोघांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला होता.

रायजी यांनी 1940 च्या दशकात नऊ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. त्यांनी रचलेल्या 277 धावांमध्ये 68 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. नागपूर येथे ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’ संघातून त्यांनी पदार्पण केले. तर विजय मर्चंट यांच्या नेतृत्वात 1941 मध्ये पश्चिम भारत संघ खेळला, तेव्हा रायजी यांचे मुंबई पदार्पण झाले. असे म्हटले जाते की त्यांच्या इतके क्रिकेटचे अगाध ज्ञान कोणालाच नव्हते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here