मोठी बातमी : इंधन दरवाढ थांबेना; आठवडाभरात पेट्रोल-डिझेल 4 रुपयांनी महागले

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

एकीकडे कोरोनामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहे. तर दुसरीकडे इंधन कंपन्या पेट्रोल-डिझेल दरात सतत वाढ करीत आहे. गेल्या आठवडाभरात पेट्रोल डिझेल साधारण 4 रुपयांनी महागले आहे.

इंधन कंपन्यांनी पेट्रोल आज पुन्हा प्रतिलिटर 59 पैशांनी तर डिझेलमध्ये 58 पैशांची दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात सलग ही वाढ होत आहे. पेट्रोल 3 रुपये 90 पैसे तर डिझेल 4 रुपयाने वाढले आहे.

दरम्यान या सततच्या इंधन दरवाढीमुळे महागाई देखील वाढणार असल्याचे बोलले जात आहे. परिणामी आधीच कोरोनामुळे आर्थिक चणचणीत सापडलेल्या जनतेला इंधन दरवाढीमुळे मोठा फटका बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here