विरोधकांची पत्रकबाजी हा भंपकपणा

3

उपनगराध्यक्ष पाटील यांचा दावा

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
नेवासा : नेवासा नगरपंचायतच्या माध्यमातून ना. शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासासाठी स्वच्छतेचे टेंडर एस.एफ.एम. कंपनीला देण्यात आले होते. त्याला आता तीन महिने होत आहे. प्रशांत गडाख यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे सुमारे 67 लाखाचा फायदा नगरपंचायतला झाला असल्याची माहिती नगराध्यक्षा योगिता सतीश पिंपळे व उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी दिली. विरोधकांच्या भंपक पत्रकबाजीला नेवासकरांनी बळी पडू नये, असे आवाहनही नगराध्यक्षा योगिता पिंपळे व उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी नेवासकरांना केले आहे.
यावेळी काढलेल्या पत्रकात नगराध्यक्षा पिंपळे व उपनगराध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे की, कॉन्ट्रॅक्टरला काम देत असताना त्याला नगरपंचायत मालकीची जागा देणे आवश्यक असते. मागील झालेला जागेचा व्यवहार आपल्या सर्वांना माहित आहे, ती जागा मागील सत्ताधार्‍यांनी बाजारभावापेक्षा दहा पटीने जास्त म्हणजे एक कोटी पस्तीस लाख रुपयाला खरेदी केली होती; परंतु सत्ता परिवर्तन झाल्यानंतर प्रशांत गडाख यांनी त्यात लक्ष घालून ती जागा व्यवहार झालेला असतानाही व शिवाय 67.5 लाखाचे पेमेंट दिलेले असताना ही जागा मालकाशी बोलून तेव्हढ्याच पैशात म्हणजे 67.5 लाखात फायनल केली. पण या लॉकडाऊन काळात सबरजिस्टर ऑफिस बंद असल्यामुळे ती जागा ताब्यात येण्यास वेळ लागला यामध्ये प्रशांत गडाखांनी 67.5 लाख रुपये नेवासा नगरपंचायतचे (नेवासकरांचे)वाचवले त्याबद्दल अभिनंदन करायचे सोडून नेवासकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो आहे या बद्दल खंत व्यक्त केली.
नेवासा नगरपंचायतची मालकीची जागा नसल्यामुळे सुरवातीला घनकचरा व्यवस्थापनाला काही अडचणी आल्या. आता जागा ताब्यात आल्यापासून त्या जागेवर ओल्या व सुक्या कचर्‍याचे विलीगीकरण होत आहे प्रत्येक प्रभागात रोज गाडी येत आहे त्यात काही प्रभागात नाल्या काढण्याची जी अडचण होत आहे तेथे त्या काँट्रॅक्टरला माणसे वाढवण्यासाठी सांगितले आहे आता काही दिवसापूर्वी एक अर्ज देण्यात आला की सॅनिटरी नॅपकिन नाही, हॅड्रॉलिक हॉपर,कंपोस्ट शेड, लोडर नाही, ट्रायल पीट नाही तर आता पर्यंत ज्यांनी अडीच वर्षे हया गोष्टी केल्या नाही त्यांनी हे बोलूच नाही हया सर्व गोष्टी नगरपंचायतने पुरवायच्या असतात पण आपण निधी असूनही काही केला नाही ही गोष्ट नेवासकर म्हणून तुम्ही चेक करू शकता की निधी कधी आलाय.. पण करायचा काहीच नाही जे करताय त्यांना व्यवस्थित करू द्यायचं नाही, तुम्ही विरोधकांची भूमिका निभावण्यापेक्षा सहकार्‍याची भूमिका निभवावी कारण हे गाव आपलं आहे त्याचा विकास करणं हे आपलं सर्वांचे कर्तव्य आहे प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा शहराचा विकास होणार हे निश्चितच विरोधकांच्या भंपक व दिशाभूल करणार्‍या विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन ही नगराध्यक्षा योगिता पिंपळे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी नेवासकरांना केले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here