Shrirampur : माशांसाठी लावलेल्या जाळ्यात 25 ते 30 साप अडकले; बघ्यांची गर्दी

परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य; प्रशासनाकडून पाण्यासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन   
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील महादेव देवस्थान परिसरातील स्मशानभूमी समोर पांदन क्षेत्रामध्ये अज्ञात व्यक्तीने मासे पकडण्यासाठी जाळे लावले होते. त्यामध्ये २५ ते ३०धामन जातीचे मोठमोठे साधारण ६ ते ७ फुटापर्यंत ओढ्यातील पाण्यामध्ये जाळ्यामध्ये तरंगताना आढळुन आले. परिसरात दुर्गंधी वास येत असल्याने व रोडपासून स्पष्ट दिसत असल्याने परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले.
सकाळपासून परिसरातील नागरिक याच रस्त्याने ये-जा करत असतात. अनेकांनी मोबाईलवर फोटो काढले. तसेच परिसरामध्ये मृत सर्पाबद्दल माहिती वार्‍यासारखी पसरली. ग्रामस्थांकडून वनसंरक्षक विकास पवार यांना घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत जागेवर पाहणी केली व वरिष्ठ अधिकारी यांना घटनेची माहिती कळवली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी यांनी मृतसर्पा बद्दल शासकीय वैद्यकीय अधिकारी यांना माहिती देण्यास सांगितले. या सापांचे शवविच्छेदन करण्याचे ठरविले. त्यानुसार २ सर्प शवविच्छेदन करण्यासाठी वन संरक्षक
विकास पवार यांनी ताब्यात घेतले.
ही घटना जिल्हा पोलीस अधीक्षकांना कळताच आदेशानुसार श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसूद खान तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट असिस्टंट पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानुसार पोलीस हवालदार लोटके यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, गिरी, उपस्थित होते.
सापाचा वास येत असल्याने परिसरात जेसीबीच्या सहाय्याने खड्डा घेऊन सर्व सापावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्रसंगी येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य सचिन पवार, अविनाश पवार, गजानन कसार, प्रकाश गोसावी, दादा झिंज, ग्रामपंचायत कर्मचारी रमेश राठोड, काळू साळवे तसेच वन कर्मचारी मदतनीस प्रकाश दौंड यांनी परिश्रम घेतले शासकीय अधिकारी यांच्याकडून परिसरातील नागरिकांनी पाण्यासंदर्भात तसेच जनावरांना पाणी पिऊ न देण्याचे आवाहन केले आहे. पाण्यात जाळे लावलेल्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू आहे. मृत साप बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
वडाळा महादेव : वडाळा महादेव परिसरात मृत सर्पाबद्दल पाहणी करताना वनसंरक्षक विकास पवार, सचिन पवार, गजानन कसार, पत्रकार राजेंद्र देसाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here