Kada : नियंत्रण सुटून 50 फूट खोल विहिरीत जीप कोसळली; दैव बलवत्तर म्हणून तिघे प्रवासी सुखरूप

0

प्रतिनिधी | राजेंद्र जैन | राष्ट्र सह्याद्री | 

कडा – हेड लाईट्स अचानक बंद पडल्यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटून स्काॅर्पिओ जीप पन्नास फूट खोल असलेल्या विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात दैवं बलवत्तर म्हणून गाडीमधील तिन्ही प्रवाशी सुखरूप वाचले. ही घटना शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास तालुक्यातील देविनिमगाव जवळील रस्त्यालगत घडली. अपघातात करण राजू पवार, नितीन अशोक गुंड, बालू शहादेव गुंड सर्व (रा.वाघळूज ता.आष्टी), अशी जखमींची नावे समजली आहेत.

याबाबत सुत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील तिघे जण जालना येथे विवाह समारंभासाठी गेले होते. विवाह समारंभ आटोपून तिघेही स्कार्पिओ जीपमधून गावाकडे परतत होते. आष्टी तालुक्यातील देविनिमगावजवळ येताच त्या चालू जीपची हेड लाईट अचानक बंद झाली. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेलगत एका पन्नास फूट खोल असलेल्या विहिरीत कोसळली.

मात्र, सदर विहीर कोरडी असल्याने तिघेही जीपमधून तात्काळ बाहेर पडली. विहिरीमधील पायऱ्याच्या सहाय्याने तिघेजण वरती आले. याच दरम्यान, देवीनिमगाव येथील शिक्षक सचिन मार्कंडे, सुनिल राऊत व महाराज फाळके हे याच मार्गावरून गावाकडे जात होते, त्यांनी झालेला हा अपघात पाहिला. अन् मदतीला धावले. विशेष म्हणजे तिघांनीही सामाजिक भावनेतून कसलाही विचार न करता जखमींना त्वरित मदत केली. सर्व जखमींवर कडा येथील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तिन्हीही जखमीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here